पिंपरी : सोशल मीडियावर मायलेकींची बदनामी | पुढारी

पिंपरी : सोशल मीडियावर मायलेकींची बदनामी

पिंपरी : सोशल मीडियावर मायलेकींची बदनामी करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2021 ते 30 जून 2022 या कालावधीत भोसरी येथे घडला. श्रीकांत दिलीप गायकवाड (32, रा. जेलरोड, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी तरुणी आणि त्यांच्या आईचा फोटो अश्लील मजकूरासह सोशल मीडियावर अपलोड केला. तसेच, फिर्यादी तरुणी आणि त्यांची वाहिनी यांच्याबाबत आरोपीने अश्लील संदेश पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button