Sharad Pawar : शरद पवारांची बंडखोर आमदारांना धमकी! म्हणाले, 'किंमत मोजावी लागेल' | पुढारी

Sharad Pawar : शरद पवारांची बंडखोर आमदारांना धमकी! म्हणाले, 'किंमत मोजावी लागेल'

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर राजकीय वर्तुळातून सध्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा दिला आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीने अडीच वर्षे चांगले कारभार केला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले नेते इथे आल्यानंतर वस्तूस्थिती मांडतील. आमदार महाराष्ट्रात आल्यानंतर समजेल की महाविकासआघाडी सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती महाराष्ट्रात अनेक वेळा बघितली. हे सरकार टिकून राहिल असं मत देखील त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं.

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना आता उधान आले आहे. यावर फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय संकट दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. महाविकास आघाडीसाठी सध्या परिस्थिती अत्यंत कठीण असून बहुमत मिळवणे हे मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने आपल्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक देखील घेतली आहे. त्या बैठकीत शरद पवार यांच्या वतीने अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाल क्लीन चीट देत, सरकार पाडण्यामागे भाजपचा हात नसल्याचे स्पष्ट सांगितले.

हेही वाचा

Back to top button