वाशिम रायफल क्लबच्या ३ रायफल शूटरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड  | पुढारी

वाशिम रायफल क्लबच्या ३ रायफल शूटरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड 

वाशिम; पुढारी वृत्तसेवा: अहमदाबाद (गुजरात) येथे प्री-नॅशनल रायफल शूटींग स्पर्धा दि.१४ ते १९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत पार पडली. या स्पर्धेमध्ये रायफल शूटिंग या प्रकारामध्ये वाशिमचे ३ खेळाडू सहभागी झाले होते त्यांची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

यात रायफल शूटिंग स्पर्धेत मुलांपैकी क्षितिज कैलास राऊत याने (४०० पैकी ३८१ गुण), अरहंत अरविंद घुगे याने (४०० पैकी ३७० गुण) आणि रुषभ अजय ढवळे याने (४०० पैकी ३७०) गुण घेतले आहेत. या तीन शूटरची प्री- नँशनल रायफल शूटिंग स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

वाशिम जिल्ह्यात प्रथमच ३ खेळाडू प्री-नॅशनल शूटींग स्पर्धेत सहभागी होऊन त्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल दि.१७ ऑगस्ट रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रशिक्षक प्रल्हाद आळणे, क्षितिज राऊत, अरहंत घुगे, रुषभ ढवळे यांचा रफिक मामु, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम चव्हाण, म. पो. महेश आकरे, शिक्षक अरविंद घुगे, सह प्रशिक्षक अनुप मानतकर, सोनल चव्हाण, जानव्ही मानतकर आणि मृणाली आकरे उपस्थित होते. जिम कोच सागर आळणे यांनी तिघांना पुष्पहार घालून खेळाडूंचा सत्कार केला.

या विद्यार्थ्यांच्या निवडीचे वाशिम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्व खेळाडूंना येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी तसेच पुढील वाटचालीस वाशिम जिल्हावासियांनी तसेच वाशिम जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप शंकरलाल हेडा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेकांनी दिल्या शुभेच्छा

तसेच वाशिम रायफल क्लबचे अध्यक्ष तथा जेष्ठ क्रीडापट्टू रफीक खान, हाजी खान ( मामू ) तसेच उपाध्यक्षा आशाबाई गंगाधर शिवणकर व वाशिम रायफल असोसिएशनच्या व वाशिम रायफल क्लबच्या सचिव निशा गंगाधर शिवणकर, सहसचिव सागर संजय निवलकर, कोषाध्यक्ष महादेव नारायण तूर्के,

सदस्य विद्याधर नानाजी मानतकर, प्रज्ञा महादेव तुर्के, संतोष आत्माराम आळणे, वैशाली संजय निवलकर, सागर रमेश आळणे, सचिन रमेश आळणे या सर्वांनी तसेच सर्व खेळाडूंच्या पालक वर्गानी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

पाहा : विद्यार्थ्यांनी CA होण्याचे स्वप्न बाळगावे : C.A डॉ. दिलीप सातभाई

Back to top button