रॅगिंग : मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

रॅगिंग : मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरण समोर आले आहे. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१७) घडला. डॉ. स्वप्निल महारुद्र शिंदे (२६) असे या डॉक्टरचे नाव आहे. महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींच्या रॅगिंग मुळे डॉ. स्वप्निलचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल कॉलेजच्या बाथरुममध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास डॉ. स्वप्निल शिंदे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कॉलेजमध्येच उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास डॉ. स्वप्निलचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. डॉ. स्वप्निल यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार स्वप्निलने सकाळी सातच्या सुमारास आईसोबत चर्चा केल्याचे सांगितले. त्यानंतर प्रशासनाने फोनवरून स्वप्निल बेशुद्ध झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी स्वप्निलला काय झाले याबाबत काहीच सांगितले नाही.

महाविद्यालयातीलच दोन विद्यार्थिनींनी स्वप्निलचे रॅगिंग केले. सहा महिन्यांपूर्वीही असाच छळ केल्याने महाविद्यालयाने आम्हाला बोलावून घेतले होते. मात्र त्यावर त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे रॅगिंग करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल करणे, स्वप्निलचे इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी स्वप्निलच्या वडिलांनी केली आहे.

  • पालकांनी स्वप्निलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक स्त्री आणि दोन पुरूष एकत्र राहू शकतात का? नवी वेबसेरिज ‘सोप्पं नसतं काही ‘

Back to top button