नागपूर : धर्माच्या नावावर भाजपचे राजकारण; नाना पटोलेंनी भाजपला फटकारले | पुढारी

नागपूर : धर्माच्या नावावर भाजपचे राजकारण; नाना पटोलेंनी भाजपला फटकारले

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा

धर्माच्या नावावर भाजपचे राजकारण सुरू आहे. म्हणूनच त्यांना जातनिहाय जनगणना करायची नाही. परंतु जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, या मतावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे मत नाना पटोले यांनी नागपूर येथे व्यक्त केले आहे.

जातनिहाय जनगणनेने देशातील अनेक प्रश्न सुटण्यास मदतच होईल, असेही काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. जनगणना करताना ती जातीनिहाय करण्यात यावी, असा ठराव विधानसभेने मंजूर करून केंद्राकडे पाठवला होता. पण तो केंद्र सरकारने फेटाळला होता. यानंतर जातीनिहाय जनगणना व्हायला हवी असं मत विधानसभेत बोलताना सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केलं.

यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपण जातनिहाय जनगणना संदर्भात केंद्राला पत्र लिहून विनंती करू असं सांगितलं होतं, परंतु हा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला होता.

हेही वाचा :

Back to top button