नाशिक : गळफास घेत दोघांची आत्महत्या | पुढारी

नाशिक : गळफास घेत दोघांची आत्महत्या

नाशिक : वेगवेगळ्या घटनांमध्ये सोमवारी (दि. २३) दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केली. रोहन शंभू ठाकूर (२५, रा. अंबड गाव) याने सोमवारी (दि. २३) राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या ठिकाणी प्रकाश विठ्ठल शिंदे (३२, रा. शिवाजीनगर) यांनी दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button