नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध असतानाही मुख्यमंत्र्याकडून वाचवण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस | पुढारी

नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध असतानाही मुख्यमंत्र्याकडून वाचवण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवाब मलिकांचे ड[-गँगशी संबंध असतानाही सरकार नवाब मलिकांना वाचवत आहे, मुख्यमंत्री ड[-गँगशी संबंध असलेल्या मंत्र्यासोबत काम करू पाहत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

दोन वर्षे महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणासाठी इप्मेरिकल डेटा तयार करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाहीओबिसींच्या आरक्षणासाठी सरकारने कोणतीही धडपड केली नाही. पण तुरूंगात असलेले आणि डी-गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रीमंडळात राहिले पाहिजेत यासाठी महाविकास आघाडी धडपड करत आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

भारतात सध्या शांतता आहे, गेली अनेक वर्षे लांगूनचालणाची नीती काँग्रेसने भारतात आणली त्यामुळेच समाजात दुफळी निर्माण झाली. ती दुफळी दूर करून आपण एका भारत मातेचे पुत्र आहोत म्हणून काम करत आहोत हा नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button