भंडारा : सनफ्लॅग कंपनीचा कर्मचारी कार अपघातात ठार

भंडारा : सनफ्लॅग कंपनीचा कर्मचारी कार अपघातात ठार

Published on

भंडारा ; पुढारी वृत्तसेवा : भंडारा येथून वरठी येथील सनफ्लॅग कंपनीकडे जाणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सनफ्लॅग कंपनीचे टेक्निशियन रमेश टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, डेप्युटी मॅनेजर युवराज भुरे हे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास वरठी ते सिरसी या महामार्गावर घडली.

रमेश टंडन आणि युवराज भुरे हे दोघेही मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत नोकरीवर आहेत. काही महत्त्वाच्या कामाकरिता हे दोघेही रमेश टंडन यांच्या चारचाकी वाहनाने भंडारा येथे आले होते. काम आटोपून रात्री दोघेही वरठीकडे परत निघाले होते. दरम्यान, सिरसीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यात टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, भुरे हे गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. दरम्यान, वरठी पोलीस घटनास्थळी पोहचले. गंभीर जखमी भुरे यांना भंडारा येथे आणि त्यानंतर नागपूरला हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी वरठी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष वंजारी करीत आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news