Amruta Fadnavis tweet : अमृता फडणवीस यांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा, ट्विट करत म्हणाल्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही एक ट्विट (Amruta Fadnavis tweet) करत उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांना वेगळे वळण येवू लागले आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. राजकीय नेते महासभा, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहेत. शनिवारी दि. १४ मे रोजी झालेल्या मास्टर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून निशाणा साधला. ते यावेळी म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीसांनी बाबरीवर पाय ठेवला असता तरी ती पडली असती, याला रविवारी (दि.१५ मे) झालेल्या सभेत फडणवीसांनी उत्तर दिलं की, बाबरी पडण्यासाठी गेलो होतो, याचा मला अभिमान आहे. आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन 128 किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही.
Amruta Fadnavis tweet : नेमकं काय आहे अमृता फडणवीस यांचं ट्विट
फडणवीसांच्या सभेनंतर त्यांच्या पत्नी अमृता राव यांनी एक सुचक ट्विट करत उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लावला आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणतं आहेत की, वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया… असे ट्विच त्यांनी केले आहे. यात त्यांनी कोणाचेही नाव जरी घेत नसले तरी या ट्विटचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे स्पष्ट जाणवतं आहे. अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा राजकीय युद्ध रंगण्याची शक्यता आहे.
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया … 🙃#Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2022
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.
अपघात अटळ आहे.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
हेही वाचलंत का?
- गुड न्यूज! मान्सून अंदमानात दाखल, ५ दिवस अगोदरच केरळमध्ये धडकणार
- गोवा : गप्प रहा, अन्यथा परीक्षेत पाहून घेऊ; प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना धमकी
- राखीगढीत 1 नव्हे 40 सांगाडे; एकाच्या डीएनएत भारतीय वंश