केतकी चितळेवर कारवाई करा ; पंकज भुजबळ शिष्टमंडळासह नाशिक पोलिस आयुक्तांकडे | पुढारी

केतकी चितळेवर कारवाई करा ; पंकज भुजबळ शिष्टमंडळासह नाशिक पोलिस आयुक्तांकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडे केली आहे.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने अ‍ॅड. नितीन भावेंची पोस्ट शेअर करून खा. शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर निंदाजनक टीका केली आहे. खा. पवार हे ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या आजाराबद्दल त्यांना हिनवणे निषेधार्थ आणि गंभीर आहे. त्याचप्रमाणे निखिल भामरे या विद्यार्थ्यानेही गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, सरचिटणीस संजय खैरनार, निवृत्ती अरिंगळे, समाधान जेजुरकर, सोनिया होळकर, डॉ. योगेश गोसावी, धनंजय निकाळे, किशोरी खैरनार आदी उपस्थित होते.

Back to top button