चंद्रपूर : तेंदूपत्ता तोडायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार; ताडोबाच्या बफर झोनमधील घटना | पुढारी

चंद्रपूर : तेंदूपत्ता तोडायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार; ताडोबाच्या बफर झोनमधील घटना

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा  चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्यात ठार होण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ताडोबाच्या बफर झोनमध्ये तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्यात मृत्‍यू झाल्याची घटना आज ( दि. १४)  सकाळी  उघडकीस आली. जाईबाई जेंगठे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. ती ताडोबा लगतच्या मोहूर्ली येथील रहिवासी होती.

ताडोबा बफर झोनमधील मोहूर्ली येथील जाइबाई जेंगठे या सकाळी सीताराम पेठ जंगलात तेंदूपत्ता तोडायला गेल्‍या हाेत्‍या. दरवर्षीप्रमाणे त्‍या मोहफूल गोळा करीत होत्‍या. यावेळी  जंगलात दबा धरून बसलेल्‍या वाघाने त्‍यांच्‍यावर हल्ला केला. यामध्‍ये जाईबाई या जागीच मृत्‍यू झाला.

या घटनेची माहिती पसरताच घटनास्थळावर नागरिकांनी  घटनास्‍थळी  एकच गर्दी केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले. सद्या तेंदूपत्ता तोडण्याचा कालावधी सुरू आहे. गावातील सर्व नागरिक जंगलात तेंदूपत्ता संकलन करायला जातात. मात्र पोट भरण्यासाठी जंगलात जाणाऱ्या स्‍थानिकांना वन्यप्राण्यांच्या हल्यात जीव द्यावे लागत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button