

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही लोक महाराष्ट्र सरकारला बदनाम करत आहेत. काहीजण अडथळे निर्माण करत आहेत. हे नशेबाज लोक आहेत. महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये असे शुद्र कीटक फिरत असतात. खिडकी उघडल्यानंतर हवा आली की हे सर्व कीटक वाहून जातील. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर केली.
शिवसेनेची मुंबईमध्ये आज सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त करत पत्रकारांशी संवाद साधला. आज फक्त भगव्या रंगाचा धनुष्य दिसेल. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदूह्रदय सम्राट होते. त्यामुळे हिंदुजननायक हा प्रश्नच उभा राहत नाही. असं मतदेखील त्यांनी व्यक्त केलं.
शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता लागून राहिली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरणावर आलेलली मरगळ उद्धवजींच्या भाषणाने दूर होईल. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेने चालू आहे. मुंबईत आज शिवसेनेची भव्य सभा होणार आहे. आम्हाला सभेसाठी गर्दी जमवावी लागणार नाही. या गर्दीला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळतो. अनेकांच्या पोटदुखीवर आज उपचार होणार असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.
हेही वाचा