Maye Musk : एलॉन मस्‍कच्‍या आईने केली ट्विटरमध्‍ये ‘या’ बदलाची मागणी | पुढारी

Maye Musk : एलॉन मस्‍कच्‍या आईने केली ट्विटरमध्‍ये 'या' बदलाची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकतीच जगप्रसिद्‍ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर एलॉन मस्‍क यांनी विकत घेतली आहे. यानंतर ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. आता त्‍यांच्‍या आई लेडी मस्‍क (Maye Musk) यांनी ट्‍टिवरमध्‍ये एक बदल करण्‍याची मागणी केली आहे. त्‍यामुळे लेडी मस्‍क सध्‍या चर्चेत आहेत.

Maye Musk : एडिट बटनची सुविधा द्‍यावी

लेडी मस्‍क यांनी ट्विटरमध्‍ये एडिट बटण सुरु करण्‍याची मागणी केली आहे. यासाठी त्‍यांनी २००७ मधील आग्रा येथील ताज महलला भेट दिल्‍याचा फोटो शेअर केला. मात्र त्‍यांनी नंतर यातील चूक दुरुस्‍त करत नवीन ट्विट करत हा फोटो २०१२ मधील असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तसेच ट्विटरने ग्राहकांना आता एडिट बटनची सुविधा द्‍यावी, असे आवाहन त्‍यांनी केले आहे. तसच २००७ नव्‍हे २०१२, कोठे आहे एडिटचे बटन, असा सवाल त्‍यांनी केला आहे.

मागील काही वर्षांमध्‍ये ट्विटर वापरकर्ते ही एडिट बटनासंदर्भात विचारणा करत होते. आता कंपनीने पुढील महिन्‍यात याबाबत कार्यवाही केली जाईल, असे स्‍पष्‍ट केले आहे. मात्र याची तारीख जाहीर केलेली नाही. तसेच या सुविधेचा गैरवापर होवू नये, यासाठीही काळजी घेतली जात असल्‍याचेही कंपनीने स्‍पष्‍ट केले आहे. तसेच एलॉन मस्‍क हेही यासाठी मागील अनेक वर्षांपासून आग्रही आहेत.

मस्‍क यांचे वादग्रस्‍त ट्विट चर्चेत

नुकतीच मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विट (Tweet) खरेदी करणारे इलॉन मस्क यांनी आपल्या रहस्य मृत्यूसंदर्भात चर्चा केली आहे. आपल्या आश्चर्यकारक आणि वादग्रस्त ट्विटने नेहमीच चर्चेत राहणारे मस्क यांनी पहिल्यांदाच आपल्या मृत्यूसंदर्भात भाष्य केले होते. त्‍यांनी म्‍हटलं होतं की, “माझा रहस्यमयरित्या मृत्यू झाला की, तुम्हाला हे जाणून आनंदच वाटेल”.

इलॉन मस्क यांच्या वादग्रस्‍त बोलण्यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडलेले दिसत आहेत. मस्क यांना रशियन अधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी अशा आशयाचे ट्विट केले होते. मस्क यांनी रशियन स्पेस एजन्सीचे संचालक दिमित्री ओलेगोविच रोगोजिन यांनी रशियाच्या माध्यमांसमोर केलेले विधान शेअर केलेले होते. रोगोजिन म्हणाले होते की, “इलॉन मस्क युक्रेनमध्ये फुटिरतावाद्यांना शस्त्र पुरवठा करत आहेत. तुम्ही किती मुर्ख असलात तरी चालेल, या प्रकरणात मस्क जबाबदार ठरविले जाणार”.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय रोस्कोस्मोसचे प्रमुख रोगोजिन यांनी ट्विटरचे (Tweet) मालक इलाॅन मस्क यांनी निशाणा साधला होता आणि मस्क यांना युक्रेनला शस्त्रे पुरविण्याची धमकीदेखील दिली होती. रोगोजिन यांनी रशियन माध्यमांना सांगितले की, “इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने इंटरनेट टर्मिनलला लष्करी हेलिकॉप्टरद्वारे मारियुपोल शहरात नाजी आजोव बटालियन आणि युक्रनी मरीन फुटिरतावाद्यापर्यंत पोहोवचले. आमच्या माहितीनुसार स्टारलिंक उपकरणची डिलिव्हरी पेंटागनद्वारे करण्यात आली होती.”

हेही वाचा : 

 

Back to top button