नागपूर : महाकालीनगर झोपडपट्टीला भीषण आग | पुढारी

नागपूर : महाकालीनगर झोपडपट्टीला भीषण आग

पुढारी ऑनलाईन : बेलतरोडी भागातील महाकाली नगर झोपडपट्टीला सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास भीषण आग लागली. घरगुती गॅस सिलेंडर च्या स्फोटामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. झोपडपट्टीमधील अनेक झोपड्या या भीषण आगीत जळून खाक झाल्या आहेत.  ही घटना समजताच अग्नीशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या असून, आग विझवण्याचे  प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगी दरम्यानच दहा ते १२ सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती आहे, पण या माहितीला अग्निशमन दलाच्या जवानांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत. नागपूर शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टीतच ही घटना घडली आहे. सुरुवातीला एका झोपडीत आग लागल्यानंतर शेजारच्या अनेक झोपड्या देखील जळत गेल्या, त्यामुळे अनेक घरातील समान जळून राख झाले आहे. आग बर्‍यापैकी आटोक्यात आली असून, अद्याप तरी यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, त्यांना आग विझविण्यात यश मिळाले आहे. आग नेमकी कश्यामुळे आणि कुठे लागली यासंदर्भात अद्याप खुलासा झालेला नाही, मात्र आगीच्या घटनेने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button