Sanjay Raut : जास्त फडफडू नका, पिसं गळतील : संजय राऊतांचा सोमय्यांना टोला | पुढारी

Sanjay Raut : जास्त फडफडू नका, पिसं गळतील : संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : “ईडीने धाड टाकलेल्या कंपन्यांची सोमय्यांच्या ट्रस्टला कोट्यवधींचे मदत करण्यात आली आहे. सोमय्या हे जामीनावर सुटलेले गुन्हेगार आहेत. युवक प्रतिष्ठानकडे कोट्यवधी रुपये कसे आले? त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे डोकं ठिकाणावर आहे का? जास्त फडफडू नका, पिसं गळतील. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये”, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज लगावला.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे कुटुंब हे संजय राऊत यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर  माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “कोट्यवधी रुपये युवक प्रतिष्ठानकडे कसे आहेत? निधी देणाऱ्या कंपन्या यंत्रणांच्या रडारवर आहे. विक्रांत आणि टाॅयलेट घोटाळ्यांपेक्षा मोठे घोटाळे बाहेर येणार आहेत. या घोटाळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. वसुली गॅंगचा सूत्रधार मुलुंडचा माणूस आहे.”

हे वाचलंत का? 

Back to top button