अकोला : लाच स्वीकारताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

अकोला : लाच स्वीकारताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

अकोला, पुढारी वृत्तसेवा : नगर परिषदेमध्ये प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नायब तहसीलदार हरीष बजरंग गुरव (वय ४२) यास अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना सापळा रचून गजाआड केले. गौण खनिजाची वाहतूक सुरु ठेवण्यासाठी गुरव याने आठ हजार रुपये तक्रारदाराकडून घेताना रंगेहाथ पकडले. आरोपी लोकसेवक हा मुळचा कोल्हापूर जिल्हयातील गारगोटी (ता. भुदरगड) येथील मुळ रहिवाशी आहे.

महसूल विभागासह नगररचना विभागात खळबळ उडाली

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, अकोट तालुक्यातील एका तक्रारदारास वाळू वाहतुकीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी आरोपी हरिष गुरव याने केली होती. तडजोडी अंती ही रक्कम ८ हजार पर्यंत देण्याचे ठरले होते. या नंतर शुक्रवार (दि.२९) एप्रिल रोजी गुरव यांची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणीची पळताळणी करण्यात आली. त्यानंतर अमरावती लाच लुचपत विभागाने सापळा रचला. दरम्यान अकोट मुख्याधिकारी कार्यालयात पंचासमक्ष रुपये ८ हजार लाच स्वीकारल्यानंतर नायब तहसीलदार गुरव यास पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती या पथकाने केली. तसेच त्‍यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा  

Back to top button