बीड : लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

बीड : लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

अंबाजोगाई, पुढारी वृत्‍तसेवा : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजारांची लाचेची मागणी केली. तडजोडअंती 15 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन चंद्रकांत चौरे (वय 33, पोलीस नाईक), प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर) (वय 51 सहा.पोलीस उपनिरीक्षक) अशी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

चौरे व सेंगर यांनी तक्रारदारास त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत केली. तसेच पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले.

ही लाच गुरूवारी (दि. 28) मागितली होती. तर 2 मार्च व 3 मार्च आणि 1 एप्रिल रोजी याबाबत पडताळणी करण्यात आली. त्‍यानंतर याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन्ही लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news