राष्ट्रीय महामार्गावरील दरडीसंदर्भात लार्सन टुब्रो तातडीची कार्यवाही! | पुढारी

राष्ट्रीय महामार्गावरील दरडीसंदर्भात लार्सन टुब्रो तातडीची कार्यवाही!

महाड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगावनजीक दरडी कोसळण्याचा धोका संदर्भात दै. पुढारीच्या शुक्रवारच्या अंकामध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेतली आहे. यात राष्ट्रीय महामार्गाची ठेकेदार असणाऱ्या लार्सन टुब्रो कंपनीने तातडीने एमआयडीसीच्या फायर स्टेशन्सची मदत घेतली आणि नडगावजवळ दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये पाण्याचा वापर करून संदर्भात लूज बोल्डर काढून टाकल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने नडगावजवळील या दरडींच्या ठिकाणी असलेली लूज बोल्डर रस्त्यावर आल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. या घटनेसंदर्भात शुक्रवारच्या ‘दैनिक पुढारी’ च्या अंकामध्ये नळेगावनजीक दरड कोसळण्याचा धोका या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेली वृत्ताची दखल आज शुक्रवारी लार्सन टुब्रो कंपनीने घेतली आहे. तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे आगामी काही दिवसांत या मार्गावर जाणाऱ्या मोटारसायकलद्वारे अथवा छोट्या गाडीचालकाना सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभाग स्थानिक प्रशासन व लार्सन टुब्रो कंपनीच्या संबंधित यंत्रणांकडून तातडीने करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल मार्गावरील प्रवास करणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील कामगार वर्गासह संबंधित यंत्रणांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button