वाशिम : बंजारा समाज ठाकरे सरकारवर नाराज, संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी

वाशिम : बंजारा समाज ठाकरे सरकारवर नाराज, संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी

Published on

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी बंजारा समाज सध्या आक्रमक झाला आहे. बंजारा समाजाच्या धर्मगुरूंची एक बैठक नुकतीच बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख आलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पार पडली. यामध्ये त्यांनी ही मागणी केली.

फडणवीस सरकारच्या काळात पोहरदेवीच्या विकासासाठी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिल्याने बंजारा समाज ठाकरे सरकारवर नाराज आहे. त्यामुळे २३ एप्रिलला हजारो बंजारा बांधव, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाणार आणि तिथे बंजारा रीती रिवाजा प्रमाणे भोग चढवून मूक आंदोलन करणार अशी माहिती पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी माहिती दिली आहे.

पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे बंजारा समाजाचा कुणीही प्रतिनिधी मंत्रिमंडळात राहिला नाही. समाजावर अन्याय होत असून हा अन्याय दूर करण्यासाठी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्याच्या काळात पोहरादेवीच्या विकासासाठी मंजूर केलेला निधी तात्काळ देण्यात यावा अशीही मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news