Chandrapur Crime : अखेर ‘त्या’ तरुणीचा मृतदेह चंद्रपूरमध्‍ये केला दफन

Chandrapur Crime
Chandrapur Crime
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा  : आठवड्यापूर्वी भद्रावती शहरातील ढोरवासा-पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतात निर्वस्त्र, शिर नसलेला आढळून आलेला 'त्या' तरुणीचा मृतदेह शनिवारी ( दि.९ ) चंद्रपूरात दफन करण्यात आल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.  (Chandrapur Crime )शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या सहाय्याने त्या तरुणीची ओळख पटविण्यात आल्याची सर्वप्रथम वृत्त 'दै पुढारी' ने दिले हाेते. शनिवारी चंद्रपूर पोलिसांनी यासंदर्भात प्रसिद्ध पत्रक काढले. तरुणीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असले तरी या हत्याकाडांतील आरोपींचा अद्याप सुगावा लागलेला नाही. कमालीची गुप्तता पाळुन सुरू असलेला तपास नरबळी व सामूहिक अत्याचाराच्या दिशेनेही पळताळून पाहिल्या जात आहेत.

Chandrapur Crime : ओळख पटली; पण आरोपींचा सुगावा नाही

 सोमवारी (४ एप्रिल) ला सकाळी अंदाजे २२ वर्ष वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात आढळला होता. चार दिवसांपर्यंत  त्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. शुक्रवारी पाचव्या दिवशी मृत तरुणीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मात्र शुक्रवारी अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. शनिवारी चंद्रपूर पोलिसांनी सदर तरुणीची ओळख पटविल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्‍या माध्‍यमातून दिली. दैनिक पुढारीने एक दिवसापूर्वीच त्या तरुणीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती दिली होती.

तपास नरबळी आणि सामूहिक अत्याचाराच्या दिशेने

२२ वर्षीय तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिची ओळख पटली असली तरी हत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही.  पोलीस या प्रकरणाचा  तपास नरबळी किंवा सामूहिक अत्याचाराच्या दिशेने करत आहेत.   तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र आणि शीर नसलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे नरबळीचा संशयही व्यक्त करण्यात येत होता, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तींना चौकशीकरीता बोलाविले होते. शनिवारी त्यांना या प्रकरणाशी संबंध नसल्यामुळे सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  चौकशी करिता ताब्यात घेतलेल्य तिघां संशयितांनाअटक झाली की सोडून देण्यात आले, या बाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.

  Chandrapur Crime आठवडाभरापासून चंद्रपुरातील शवागारात ठेवून असलेल्या त्या तरूणीच्या मृतदेहावर काल शनिवारी दफनविधी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.  याबाबत पोलिसांशी संपर्क साधून खात्री करण्याचा प्रयत्न केला परंतु माहिती देण्याचे टाळण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तरुणीचा मोबाईल हाती लागला तर याच्‍यामुळे आरोपींच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news