शरद पवार अमरावती दौऱ्यावर; सर्वत्र कडेकोट बंदोबस्त | पुढारी

शरद पवार अमरावती दौऱ्यावर; सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील संघटन बांधणी करीता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे रविवारी सकाळी साडे दहा वाजता नागपुरात आगमन झाले. नागपुर विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. कार्यकर्त्यांकडून स्वागत स्विकारून ते थेट अमरावतीसाठी रवाना झाले आहेत.

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी पवार यांचा हा दोन दिवसीय विदर्भ दौरा आहे. अमरावतीला ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पश्चिम विदर्भातील कार्यकर्ता मेळाव्याला पवार संबोधित करणार आहेत.

अमरावती, अकोला, यवतमाळ बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अमरावतीत एकत्रीत झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार सदिच्छा भेट देणार आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Back to top button