काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना मातृशोक | पुढारी

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना मातृशोक

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे आज रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास वार्धक्यामुळे निधन झाले. सुमित्राबाई यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी यवतमाळ येथील निवासस्थानी अखेरचा श्‍वास घेतला.

सुमित्राबाई ठाकरे या दारव्हा तालुक्यातील हरू या गावातील. कणखर भूमिका, स्वभावातील बाणेदारपणा त्यांनी आयुष्यभर जोपासला होता. शेतीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. वार्धक्यातही त्या शेतात नित्याने जायच्या. गावात त्यांचा आदरपूर्वक दरारा होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी गावाशी आपली ‘नाळ’ जोडून ठेवली होती. मुलगा माणिकराव ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात नवनवी यशाची शिखरे पादाक्रांत केल्यानंतरही त्यांनी कधीच जगण्यातला साधेपणा सोडला नव्हता.

त्यांच्या पश्‍चात पुत्र माणिकराव ठाकरेंसह तीन मुली, जावई, नातू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, अतुल ठाकरे असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

 

Back to top button