भंडारा : कलेवाडा येथे शेतकऱ्याचा खून | पुढारी

भंडारा : कलेवाडा येथे शेतकऱ्याचा खून

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : भंडारा जिल्‍हातील कलेवाडा येथील शेतात शेतकर्‍याचा खून झाल्‍याची घटना आज सकाळी उघडकीस आली. प्रदीप मंगल टेंभुर्णे (वय ४५) रा. कलेवाडा असे त्‍यांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रदीप टेंभुर्णे यांची शेती गावाबाहेर आहे. ते नेहमी प्रमाणे शनिवारी रात्री आपले शेतावर शेतमालाची जागली करण्यासाठी गेले होते; परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतले नाहीत.  प्रदीप यांचा मुलगा ज्ञानदीप याने शेतावर जाऊन पाहिले असता प्रदीप यांच्या खून झाल्‍याचे निदर्शनास आले.  अड्याळ पोलिसांनी अज्ञाताविराधात गुन्हा नोंदविला आहे. तपास ठाणेदार सुशांत पाटील करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button