चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची होणारी अवैध तस्करी रोखण्याकरीता चंदपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आठ वाहनांतून होणाऱ्या अवैद्य तस्करीतील 71 जनावरांची सुटका केली असून, 14 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कारवाईने 71 गोवंशीय जनावरांना जिवदान मिळाले आहे. ही कारवाई (शनिवार) जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करून करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हयातून अवैध गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी दिनांक 18/08/2023 रोजी जिल्हयात ठिकठिकाणी विशेष नाकबंदी राबवण्यात आली. या धडक मोहिमेत पोलीस स्टेशन शेगाव (बु.) पोलीस स्टेशन कोठारी, गोंडपिपरी आणि पोंभुर्णा हद्दीत प्रभावी नाकेबंदी दरम्यान गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या एकुण 8 वाहनांविरुध्द कार्यवाही करून गुन्हयाची नोंद करण्यात आली. त्यात एकूण नग 71 गोवंशीय जनावरांची सुटका करून एकुण 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वरोरा ते चिमुर रोडवरील मोजा खातोडा रोडवर नाकेबंदी दरम्यान महिन्द्रा पिकअप वाहनाची झडती घेतली असता, त्यात एकूण 26 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जाताना आढळून आली. यामध्ये संशयीत आरोपी बिलाल जाकीर कुरेशी (वय 18) रा. भद्रावती, अब्दुल नाजीम अब्दुल कुरेशी (वय 28), रितीक सावंत नाम (वय 23), राजेंद भाऊराव सोयाम (वय 55), हाल राजेंद्र सोयाम (वय 26) चौघेही रा. वरोरा यांना अटक केली असून, महिन्द्रा पिकअप MH34-BG-1632 क्रमांकाच्या वाहनासह 8 लाख व पायलट करीता वापरलेली मोटार सायकल क्रं. एम.एच.34-बि.एल. 5313 किंमत 30 हजार रुपये आणि 26 जनावरे किंमत 3,29,000 असा एकूण 9 लाख 58 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत देवई फाटा रोडवर नाकेबंदी दरम्यान पिकअप मधून नेणारी 8 जनावरे ताब्यात घेण्यात आली. एम.एच. 34-ए. के. 4148 किंमत 3 लाख आणि 8 नग जनावरे किंमत 80 हजार रुपये असा 3 लाख 80 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन पोंभूर्णा हद्दीत चितलवाना केमारा रोडवर नाकेबंदी दरम्यान दोन बोलेरो वाहन आणि एक टाटा योध्दा वाहनातील 27 नग जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जाताना पकडण्यात आली. वाहन क्रं. एम.एच. 33-1-3729 किंमत 8 लाख रुपये, एक टाटा योध्दा वाहन क एम.एच. 34-बि.जी. 8978 किंमत 8 लाख रुपये, बोलेरो वाहन क. एम.एच.32-ए.जे. 4180 किंमत 8 लाख रुपये आणि 27 नग जनावरे किंमत 2 लाख 70 हजार रुपये असा एकूण 26 लाख 70 हजाराचा माल जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशन गोंडपिपरी हद्दीत विठठलाला भंगाराम तळोधी येथे नाकेबंदी दरम्यान बोलेरो मैक्स वाहनाची झडती घेतली. त्यात 10 नग जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जाताना आढळली. यामध्ये आरोपी मधु सानप देवा सराजमपेठ जिमचेरीयल, राजन्ना मलवा कोटे (वय 52), अजी राजन्ना कोटे (वय 22) दोन्ही रा. नेपल्ली जि. वेरीयल, परमेश मलया गोरे (वय 34), लक्ष्शीपेठ जिमचेरीयल रामन्ना नरसया मुल्ले (वय 40) वर्ष रा. कॅनेपल्ली जिमचेरीयल, राजा राजालिंग गोल्ला (वय 57) रा. टक्याल जिमचेरीयल याना अटक करण्यात आली. बोलेरो मॅक्स वाहन क. ए.पी. 22- वाय-7491 किंमत 3 लाख रुपये, बोलेरो पिकअप वाहन के 1519-1-3744 किंमत 3 लाख रुपये आणि 10 नग जनावरे किंमत 1 लाख असा एकुण 7 लाखाचा माल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन शेगावचे ठाणेदार, सपोनि अविनाश मेश्राम, पोलीस स्टेशन पोंभुर्णाचे ठाणेदार मनोज गदादे, पोलीस स्टेशन कोठारीचे विकास गायकवाड, पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार जिवन राजगुरु तसेच उपनि महेश सुरजुसे, सहायक फौजदार भिमराव पडोळे, शिपाई मदन गैरपणे, गणेश मेश्राम, पौ.ना. निखील कौराम सतोष निशाद, प्रफुल्ल काळे, पोउपनि श्रीकात कल्लेपल्लीवार, शिपाई आत्राम, राजकुमार चौधरी, अविनाश झा, अरविंद झाडे शिपाई किशोर मांडवगडे, सचिन पोहनकर, प्रविण कडुकर, हरी नन्नावरे, अमलेश प्रेम चव्हाण, तिरुपती गोडलवार यांनी केली आहे.
हेही वाचा :