पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (दि.२०) जयंती आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा आणि रॉबर्ट वाड्रा यांनी 'वीर भूमी'वर राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनीही लडाखमधील पेंगॉन्ग येथे त्यांचे वडील राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचवेळी राहुल यांनी वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "बाबा, भारतासाठी तुमची जी स्वप्ने होती ती या अनमोल आठवणींनी भरून गेली आहेत. तुमचे ध्येय हा माझा मार्ग आहे. प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्ने समजून घेत आहे. भारत मातेचा आवाज ऐकत आहे."
राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथील नागरिकांची भेट घेतली. तेव्हा येथील नागरिकांनी चिनी सैन्य या भागात घुसले आहेत. चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून येथील नागरिकांच्या चराईसाठी असलेल्या जमिनी हिसकावून घेतल्या असल्याचे सांगितले, असे राहुल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
हेही वाचा :