बुलडाणा : शेगावला दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; ५ ठार, ४ जखमी | पुढारी

बुलडाणा : शेगावला दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; ५ ठार, ४ जखमी

पुढारी वृत्तसेवा, बुलडाणा : शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला. देऊळगाव राजा नजीक भाविकांच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ भाविक ठार तर ४ जखमी झाले. जखमीवर देऊळगाव राजा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि.१४) सकाळी 6 वाजता घडली.

खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ५ भाविक जागीच ठार झाले. तर ४ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये बोलेरो चालक, १ महिला व ०३ पुरुषांचा समावेश आहे.

बोलेरो गाडी भक्तांना घेऊन, जालनाकडून शेगाव येथे गजानन महाराज दर्शनासाठी निघाली होती, यादरम्यान दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाल्याने ही घटना घडली. जखमींवर देऊळगाव राजा व जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचलत का ?

Back to top button