नाशिक : एकाच रस्त्यावर चार तासांच्या अंतराने विचित्र अपघात ; चौघे ठार (CCTV) | पुढारी

नाशिक : एकाच रस्त्यावर चार तासांच्या अंतराने विचित्र अपघात ; चौघे ठार (CCTV)

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : नामपूर रोडवर सकाळी अपघात होऊन चार तास उलटत नाही तोच याच मार्गावर शहर हद्दीत भरधाव वेगातील मालट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. चर्च ते पीडब्ल्यूडी कार्यालयादरम्यान उभ्या राहत असलेल्या पोलीस वसाहतीसमोर दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला. अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दुचाकीवरून दोघे रस्त्याच्या कडेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना कट मारला. दुचाकी घसरून दोघे ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली चिरडले गेले. उमेश मधुकर नेरकर (४७, रा. पीडब्ल्यडी ऑफिस मागे), दिलीप रघुनाथ येवले (५५, रा. राजमाने) अशी मृतांची नावे असल्याचे सांगण्यात येते.

सकाळी आठ वाजेच्या सुमारास याच मार्गावर म्हशींची वाहतूक करणा-या एका ट्रकने दोघांना चिरडल्याने त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. एकाच दिवशी एकाच मार्गावर दोन अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून रस्ता सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button