महिला भाविकाकडून तिरुपती बालाजी मंदिराला ९.२ कोटींचे दान | पुढारी

महिला भाविकाकडून तिरुपती बालाजी मंदिराला ९.२ कोटींचे दान

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराला एका महिलेच्या वतीने तिच्या कुटुंबीयांनी 9.2 कोटी रुपयांचे दान दिले आहे. यामध्ये 3.2 कोटींची रुपयांचे डिमांड ड्राफ्ट आणि 6 कोटींच्या मालमत्तेचा समावेश आहे. चेन्नईतील 76 वर्षीय दानशूर महिला भाविकाचे निधन झाले असून तिने आपली संपत्ती तिरुपती बालाजी मंदिराला दान केली होती. डॉ. पर्वतम असे त्या महिलेचे नाव आहे.

पेशाने डॉक्टर असणार्‍या पर्वतम तिरुपती बालाजीच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांनी लग्न केले नव्हते. आपली सर्व संपत्ती तिरुपती मंदिराला दान करण्याची त्यांची इच्छा होती. डॉ. पर्वतम यांच्या इच्छेनुसार बहीण रेवती विश्वनाथम यांनी मुलांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या निर्मितीसाठी देवस्थान समितीच्या अध्यक्षांकडे दान केलेल्या रकमेतील 3.2 कोटी रुपये सोपविले. दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिराला दरवर्षी भाविकांकडून कोट्यवधी रुपयांचे दान केले जाते. 2021 मध्ये 833 कोटी रुपये देवस्थान समितीकडे जमा झाले होते.

Back to top button