नितीन राऊत : ‘हेडगेवारांनी ब्रिटीश अटक करतील या भीतीने नेताजी बोस यांना भेट नाकारली’ | पुढारी

नितीन राऊत : 'हेडगेवारांनी ब्रिटीश अटक करतील या भीतीने नेताजी बोस यांना भेट नाकारली'

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भेट नाकारली, ब्रिटिशांच्या कारवाईचा ससेमिरा मागे लागेल म्हणून हेडगेवार यांनी नेताजी बोस यांना भेटणे टाळले असा दावा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे एका जाहीर कार्यक्रमात आज मंगळवारी नितीन राऊत यांनी हे वक्तव्य केले.

नाशिक येथे सरसंघचालक हेडगेवार हे मुक्कामी होते. सुभाषचंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला त्यांच्याकडे पाठवले. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने भेट नाकारली. असा दाखला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वणी येथील कार्यक्रमात बोलताना दिला. यांनीच जाती जातीत भांडण तंटे उभे केले, आता तेच गुलाम लोक आज शिकवायला निघाले, असे राऊत यांनी म्हटले.

सरसंघचालक हेडगेवार यांनी १९३० मध्ये यवतमाळमध्ये जंगल सत्याग्रह केला. त्यामुळे करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी हे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचलं का 

Back to top button