वाशिम : रिसोड येथे सुमारे दीड कोटींचा गुटखा जप्त | पुढारी

वाशिम : रिसोड येथे सुमारे दीड कोटींचा गुटखा जप्त

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

रिसोड (वाशिम) शहरातील अवैध धंदे व अवैध गुटखा तस्‍करीच्‍या तक्रारी प्रमाण वाढले आहे. वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्‍या  मार्गदर्शनाखाली वाशीम स्थानिक गुन्हे शाखाने  आज (२३) रोजी दुपारी  शहरातील जुनी सराफा लाईन भागातील धोबी गल्ली येथाील एका घरात छापा टाकून तब्बल दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त गुटखा जप्त केला.  रिसोड शहरातील ही गुटखा विराेधातील  सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

या कारवाईसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह म्‍हणाले,  रिसोड शहरातल्या धोबी गल्ली परिसरात मोठ्याप्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची साठवण केली असल्‍याची माहिती वाशीम स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना मिळाली हाेती. . स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या घरावर  छापा टाकला. गुटखा हा धोबी गल्लीतील एका जुन्या घरातील तीन खोल्यांमध्ये साठवण करून ठेवलेला होता.जप्तीची कारवाईनंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.  गुटखा संबंधित सर्व धागे-दोरे गोळा करण्याचे काम सुरु असल्‍याचे बच्‍चन सिंह यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

Back to top button