आर्वी येथील गर्भपात प्रकरणी डॉ. नीरज कदमला अटक | पुढारी

आर्वी येथील गर्भपात प्रकरणी डॉ. नीरज कदमला अटक

वर्धा, पुढारी वृत्तसेवा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरणात डॉक्टर नीरज कदमला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या सहा झाली आहे.

याबबातची अधिक माहिती अशी की, आर्वी शहरात असलेल्या डॉक्टर कदम रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचे प्रकरण उघडकीस  आले. तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर डॉक्टर रेखा कदम हिच्यासह पाच जणांना अटक केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी डॉ. नीरज कदमला अटक केली.

पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारातील गोबरगॅसच्या खड्ड्यातून १२ कवट्या, ५४ हाड जप्त केले होती. पोलिसांनी डॉक्टर कदम यांच्या घरी काळवीटची कातडीही सापडली होती. वनविभागाने काळवीटची कातडी जप्त केली आहे. कदम हॉस्पिटलमध्ये तपासणीदरम्यान शासकीय रुग्णालयात वापरला जाणारा काही औषधसाठाही सापडला असून पोलिसांनी यातील काही औषधी, कागदपत्रे जप्त केली आहेत.

डॉ. नीरज कदमला अटक केल्यानंतर या प्रकरणातील आरोपीची संख्या सहावर पोहोचली आहे. डॉ. नीरज कदमला न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button