अरे बाप रे! हरणाला फुटले पंख (viral video) - पुढारी

अरे बाप रे! हरणाला फुटले पंख (viral video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. यातील बरेच व्हिडिओ आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, असे असतात.  अरे बाप रे! असेही काही व्हिडिओ अगदीच भन्नाट असतात. असे व्हिडिओ व्हायरल वेगाने व्हायरल होतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशमधील छिंदवाडातील पेंच नॅशनल पार्कचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक हरीण चक्क हवेत उडताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये हरणाने रस्ता क्राॅस करताना जी उडी मारलेली आहे, ते पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण, अशक्य असणारी ही उडी मोबाईलच्या कॅमेरामध्ये पर्यटकांनी कैद केली. ही उडी बघून सगळेच नेटकरी म्हणताहेत की, “हरणाला फुटले पंख; हरीण लागले उडू”

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील पेंच नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट असतात. असेच काही पर्यटक फिरत असताना हरणाचा कळप जात होता. पण, पर्यटक पाहताच हरीण इकडे-तिकडे धावू लागले. ते हरीण घाबरले होते, त्यातून त्या हरणाने मोठी उडी मारली. ही उडी इतकी उंच आणि मोठी होती की, पर्यटक पाहतच राहिले.

हे वाचलंत का?

Back to top button