चंद्रपूर : किराणा दुकानदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग | पुढारी

चंद्रपूर : किराणा दुकानदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

किराणा सामान घेण्यासाठी दुकानात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा किराणा दुकानदाराने विनयभंग  केल्याची संतापजनक घटना राजूरा तालुक्यातील सास्ती टाऊनशिप मध्ये घडली. हा प्रकार पालकांचा लक्षात येताच पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. किराणा दुकान चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी किराणा आणण्यासाठी दुकानात आली होती. राधेश्याम नामक दुकानदाराने मुलीला वही पाहण्यासाठी दुकानाच्या आत बोलाविले. यावेळी तोंडावर सिगारेटचा धूर सोडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलगी घरी रडत गेली. घडलेला प्रकार आईला सांगितला. घटनेची तक्रार मुलीच्या आईने राजुरा पोलीस ठाण्यात केली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या‍च्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विनयभंग कलम 354 ए (1) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून सुरक्षा संरक्षण अधिनियम 2012 यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. किराणा व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button