गडचिरोलीत जोरदार पाऊस, गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद
Latest
गडचिरोलीत जोरदार पाऊस, गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद
गडचिरोली : पुढारी ऑनलाईन
जिल्ह्यात आज सकाळी जोरदार पाऊस (Gadchiroli Rain) पडला. गोविंदपूर नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद झाला आहे. तर चामोर्शी-घोट मार्गावर काही ठिकाणी झाडे तुटून पडल्याने वाहतूक खोळंबली होती. (Gadchiroli Rain)
आज सकाळी गडचिरोलीसह अन्य भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. गोविंदपूरनजीकच्या नाल्यावर पुलाचे काम सुरु असून आहे. दळणवळणासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, आज सकाळपासून या रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे गडचिरोली-पोटेगाव-कुनघाडा-चामोर्शी या मार्गाने वाहतूक वळती करण्यात आली आहे.
मागील चोवीस तासांत जिल्ह्यात चामोर्शी येथे सर्वाधिक ६६ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल आरमोरी तालुक्यात ५४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

