बीड : केजमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई - पुढारी

बीड : केजमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

केज, पुढारी वृत्तसेवा: केज येथे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर पंचायत यांनी कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनच्‍या पार्श्वभूमीवर केज येथे विनामास्क फिरणाऱ्या पादचारी आणि वाहन चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कार्यवाहीत तहसीलदार दुलाजी मेंडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अशोक साबळे सहभागी झाले होते.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्‍येत वाढत हाेत आहे. त्‍यामुळे दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे. यानंतर नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून आज मंगळवारी (दि. ११ जानेवारी) रोजी केज येथील शिवाजी चौक आणि बस स्टँडसमोर विनामस्क फिरणारे पादचारी आणि वाहनचालक यांच्यावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली.

हेही वाचलंत का?

 

Back to top button