

कल्याण : पुढारी वृत्तसेवा : कल्याण स्थानकातून एका अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना कल्याण जीआरपी पोलिसांनी बेडया ठोकल्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने सहा तासांच्या आत अपहरण करणा-यांना अटक केली. पूजा मुंडे आणि अमित शिंदे अशी या आरोपींची नावे आहेत.
कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर एक फिरस्ता महिला संजू राजवंशी ही तिच्या अडीच वर्षाच्या मुलाला सोडून वडापाव घेण्यासाठी कॅन्टीनच्या दिशेने गेली. ती पुन्हा परत आली. तेव्हा त्याठिकाणी तिचा अडीच वर्षाचा मुलगा अक्षय त्याठिकाणी नव्हता. हे पाहून तिला धक्काच बसला. तिने मुलाची शोधाशोध सुरु केली. अखेर मुलगा न सापडल्याने तिने कल्याण जीआरपी गाठले. कल्याण पोलीसांनी मुलाचा शोध घेतला.
पोलीसांनी सीसीटीव्ही पाहिला असता या मुलाला एक महिला आणि एक पुरुष घेऊन गेले असल्याचे दिसून आले. दोन्ही अपहरणकर्ते अमित शिंदे आणि पूजा मुंडे या दोघांना उल्हासनगरातून ताब्यात घेतले. मुले चोरीचे काम करतात का ? हे दोघे कोणत्या रॅकेटशी संबंधित आहेत का ? याचाही पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा