डोंबिवलीत शिवसेना शहर प्रमुखाला अटक; परस्परविरोधी गुन्हे दाखल

डोंबिवलीत शिवसेना शहर प्रमुखाला अटक; परस्परविरोधी गुन्हे दाखल
Published on
Updated on

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली पश्चिम येथे असणाऱ्या दिनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेमधील शिवसेना शहर प्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यात झालेले वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहेत. बॅनरवरून झालेल्या या वादामुळे नवनिर्वाचीत शहर प्रमुख विवेक खामकर यांना विष्णूनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. दरम्यान, खामकर यांना कल्याण न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण- डोंबिवली शहरात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. काही शिवसैनिकांनी शिंदे गट तर काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले असून, नवीन शिवसैनिकांना पदाची जबाबदारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी विवेक खामकर यांना शहरप्रमुख असे पद दिले.

मात्र, दोन दिवसानंतर खामकर आणि त्यांचे इतर सहकारी डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाळ येथील शाखेत सभासद नोंदणी फॉर्म संदर्भातील कामानिमित्त गेले होते. मात्र, शाखेच्या दारावर लावलेल्या जुन्या बॅनरवरून शाखेत बसलेल्या शाखाप्रमुख परेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे यांना तुम्ही नेमके कोणत्या गटात आहात ते आधी स्पष्ट करा? असा जाब खामकर यांना त्यांना विचारला. त्यानंतर तुम्ही शिंदे यांचे फोटो असलेले जुने बॅनर अजूनही काढले नाहीत, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच काही महत्त्वाचे पेपर आणि १५ हजार रुपये घेऊन खामकर तेथून निघून गेले, यानंतर याबबातची तक्रार शाखा प्रमुख परेश म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली.

या तक्रारीनुसार, पोलिसांनी शहर प्रमुख विवेक खामकर, विभाग प्रमुख श्याम चौगुले याना अटक केली आहे. या तक्रारीत विधानसभा महिला संघटक कविता गावंड, डोंबिवली पश्चिम महिला पदाधिकारी किरण मोंडकर यांची देखील नावे आहेत.

आम्ही असे केले नाही : कविता गावंड

या संदर्भात विधानसभा महिला संघटक कविता गावंड यांनी आम्हाला दीनदयाळ रस्त्यावरील शाखेत काही काम आहे असे सांगून बोलवून घेतले होते. त्यानुसार आम्ही तेथे गेलो होते तेव्हा तेथे काही विशेष घडले नव्हते. त्यानंतर यांनी रात्री पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही पैसे चोरल्याची तक्रार केली गेली. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता विवेक खामकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जी तक्रार केली आहे त्यात माझे व किरण मोंडकरचे नाव आहे; मग आम्हाला अटक का केली नाही? असा सवाल देखील कविता गावंड यांनी यावेळी उपस्थित केला. या संदर्भात आम्ही देखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांनी महिलांना केलेली शिवीगाळ ही दुर्लक्ष करण्यासारखी आहे का? असे त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news