Pradeep Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या अटकेसाठी ठाकरे विरुध्द शिंदे

मास्टरमाइंडला का वाचवत आहात? : आदित्य ठाकरे
Pradeep Purnekar Case
ठाणे : आदित्‍य ठाकरे आणि अन्य नेते पोलीस आयुक्तांशी चर्चा करीत असताना पोलीस आयुक्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोनदा फोन आला म्हणून आयुक्त डुंबरे यांचा चेहरा पडला होता. त्यांना मास्टरमाईंड कोण आहे, हे माहीत आहे असा दावा आदित्‍य ठाकरे यांनी केला. या भेटीत पूर्णेकर हत्‍येशी निगडीत काही व्हिडिओ राम पूर्णेकर पोलीस आयुक्तांना दाखवताना. (छाया : अनिषा शिंदे)
Published on: 
Updated on: 

ठाणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्‍या प्रकरणाचा तपास रखडत चालल्याने राजकारण तापू लागले असून शिंदे गटाच्या माजी महापौर व महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि त्‍यांचे पती राजेंद्र शिंदे या दोघांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या दोघांचेही नाव आरोपी म्हणून पुरवणी एफआयआरमध्ये असतानाही त्‍यांना अजूनही अटक झालेली नाही.

ठाणे पोलीस आणि राज्य सरकार या हत्‍या प्रकरणाच्या मास्टरमाइंडला का वाचवत आहे? असा सवाल शिवसेना नेते आदित्‍य ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत केला. त्‍याचवेळी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे; मात्र घटनेचे राजकारण होणे त्याहून जास्त दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची भूमिका मांडली. पूर्णेकर हत्‍याकांडाच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे विरुध्द शिंदे असा दोन शिवसेनांचा संघर्ष उद्‌भवला असून सर्वांचेच लक्ष आता मीनाक्षी शिंदेविरुध्द अटक कारवाई कधी होते याकडे लागले आहे.

Pradeep Purnekar Case
Sugar Factory: साखर कारखान्यांचे काटे तपासणार; तहसीलदार, पोलिस निरीक्षकासह सहा सदस्यीय भरारी पथक

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे, हे ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनाही माहिती आहे. तरीही त्‍या मास्टरमाइंडला का वाचवले जात आहे? या मास्टरमाइंडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का वाचवत आहेत? मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केला जात आहे. मुख्यमंत्री या प्रकरणावर गप्प का? असे सवाल करत शिवसेना नेते आदित्‍य ठाकरे यांनी या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर ठाण्यात महामोर्चा काढण्याचा इशारा गुरुवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून गुरुवारी दोन्ही शिवसेनेची आंदोलने होणार होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, ॲड. अनिल परब, राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव, विक्रांत चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षांतील नेत्यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर या सर्वानी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली.

त्यावेळी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविण्याचे प्रयत्न केले. घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला करीत वातावरण शांत केले. या भेटीनंतर ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेसाठी शिवसैनिकांसह ठाकरे गेले असता शिंदे सेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जमाव जमवत तेथेही घोषणाबाजी केली. या गदारोळातच आदित्य ठाकरे आणि राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठवली.

Pradeep Purnekar Case
Ahilyanagar Zilla Parishad Election: जिल्हा बँकेपाठोपाठ दिवाळीनंतर वाजणार मिनी मंत्रालयाचे फटाके!

आदित्‍य म्हणाले, पूर्णेकर कुटुंबीयांनी दिलेला व्हिडीओ हा महत्त्वाचा पुरावा आहे. तो व्हिडीओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याचे पोलिसांकडून उत्तर मिळाले. तो अहवाल कधी मिळणार याचे उत्तर मात्र दिले नाही. फक्त तपास सुरु आहे, एवढेच उत्तर पोलीस आयुक्तांकडून मिळाले.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीच्या हत्येच्या घटना घडत असताना गृहमंत्री पक्षफोडीच्या राजकारणात, जंगल लुटण्यात, झाडे तोडण्यात, सह्याद्री लुटण्यात गुंतल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. पूर्णेकर हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आदित्‍य यांनी केली. पूर्वी गुन्हेगारीचा उल्लेख करताना बिहारचे उदाहरण दिले जायचे. मात्र, आता बिहारची परिस्थिती ठाण्यापेक्षा चांगली आहे, असा टोला आदित्‍य यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.