Senior Citizen Safety: ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांचा पुढाकार; ‘पोलीस दादा’ बनले आधारस्तंभ

एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी विशेष पथके, हेल्पलाईन व नियमित भेटी; ९ हजार नागरिकांचा उपक्रमात सहभाग
ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठांना दिलासा Pudhari File Photo
Published on
Updated on

ठाणे : ठाण्यासारख्या महानगरात एकटे व जोडप्याने राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतल्या सर्व पोलीस ठाण्यात त्यांच्या परिसरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी बनवण्यात आली आहे. या जेष्ठ नागरिकांच्या घरी पोलीस वेळोवेळी भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणीच्या वेळी मदतीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले आहे. त्यात एक अधिकारी, दोन पुरुष अंमलदार, एक महिला अंमलदारांचा समावेश आहे. दरम्यान, ठाण्यात गेल्या वर्षभरात जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी शंभरहून अधिक बैठका घेतल्या आहेत. त्यात 9 हजार जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

ज्येष्ठ नागरिक
Clay Pot Water Benefits | उन्हाळ्यातील 'नॅचरल फिल्टर'! माठातील पाणी पिण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल

गेल्या काही वर्षात ठाणे-मुंबई सारख्या महानगरात एकटे अथवा जोडप्याने राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे. बदलेली जीवनशैली आणि नोकरी व्यवसायानिमित्त विदेशात अथवा इतर शहरात स्थायिक झालेली मुले या कारणांमुळे ठाण्यासारख्या महानगरातील ज्येष्ठ नागरिक एकटे राहण्यास भाग पडत आहेत. त्यामुळे उतारवयात एकटे जीवन व्यतीत करणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच एक महत्वपूर्ण मुद्दा राहिला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना राबवण्यात येतात. पण खऱ्या अर्थाने जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी चोवीस तास तत्पर असतात ते म्हणजे पोलीस दादा...!

ज्येष्ठ नागरिक
Kasara Railway Notice: कसाऱ्यात रेल्वेच्या नोटिसांमुळे खळबळ; हजारो रहिवासी आणि व्यापारी चिंतेत

ठाणे पोलिसांनी एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतल्या सर्व पोलीस ठाण्यात त्यांच्या परिसरात एकटे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांची यादी बनवण्यात आली असून या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी पोलीस वेळोवेळी भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतात. ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणीवेळी मदतीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले आहे. त्यात एक अधिकारी, दोन पुरुष अंमलदार, एक महिला अंमलदारांचा समावेश आहे. या पथकामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेण्यात येतो. गेल्या वर्षात ठाण्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी शंभरहून अधिक बैठका घेतल्या आहेत. त्यात 9 हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. पोलिसांनी विविध ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने संदर्भ प्रश्नावली बनवण्यात आली असून या प्रश्नावली नुसार जेष्ठांची माहिती संकलित करून ती पोलिसांच्या रेकॉर्डला ठेवण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिक
Solar Village Palghar: कासघर-सावरखंड गाव सौरऊर्जेने उजळले; ग्रामीण विकासाला नवी दिशा

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत जागृती करून जेष्ठ नागरिक देखील समाजातील एक अति महत्वाचा घटक आहे हे अधोरेखित करण्यासाठी पोलीस प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. महानगरात एकटे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी तर पोलीस वेळीअवेळी देवदूत बनून मदतीस तत्काळ धाव घेतात. पोलिसांच्या याच सहकार्य तत्पर कार्यपद्धतीमुळे ठाण्यासारख्या महानगरात ज्येष्ठ नागरिक अगदी सुरक्षितपणे राहत आहेत. तसेच ज्येष्ठांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. 1090 या क्रमांकावर 24 तास ज्येष्ठ नागरिकांना व त्यांच्या संदर्भातील तक्रार करता येणार आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर पोलीस तक्रार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास त्वरित मदत पोहचवणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षित पोलीस जेष्ठांच्या समस्या समजवून योग्य ती कारवाई करतात.

ज्येष्ठ नागरिक
Ekvira Devi Yatra: एकविरा जत्रेसाठी टोलमाफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

सजग राहण्याच्या सूचना

तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पीपहोल करून घ्या आणि नेहमी परिचित व ओळख पटलेल्या व्यक्तींनाच घरात प्रवेश द्या. अपरिचितांशी बोलताना कायम मुख्य दार बंदच ठेवा किंवा शेजाऱ्यांना व सुरक्षा कर्मचाऱ्याला सांगूनच अपरिचितांशी बोला, दुरुस्त्यांसाठी आलेले लोक, विक्रेते यांची ओळख पटल्यानंतरच त्यांना घरात प्रवेश द्या तसेच त्यांना प्रवेश देण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती देऊन ठेवा, चालायला किंवा मॉर्निग वोकसाठी गेल्यानंतर आसपासच्या वातावरणाबाबत सजग राहा अशा सूचना पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांना केल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक
Kalyan Market Traffic: कल्याणमध्ये आठवडा बाजारामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर

ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती

ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींचाच सहभाग असतो. उदाहरणार्थ, नोकर, नातेवाईक, विक्रेते आदी. हे लोक बहुतांशवेळा पोलीस रेकॉर्डवर नसतात. तसेच घरगुती मदतनीस व नोकरमाणसे काम सोडून जातील या भीतीतून त्यांची माहिती सहसा पोलिसांना कळवली जात नाही. त्यामुळे अनेक वेळा जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो. म्हणून पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका घेऊन त्यांना काही सूचना केल्या आहेत. नजीकच्या पोलीस ठाण्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा पूर्वेतिहास पडताळल्यानंतरच तिला कामावर ठेवावे. कायम ओळखपत्र जवळ बाळगा, नोकरमंडळी/अपरिचित लोकांसमोर आर्थिक बाबींवर चर्चा करू नका, तुमचे मौल्यवान सामान कोणत्याही बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये ठेवा, नोकरमंडळींशी माणुसकीने वागा, तुम्ही एकटे राहत असाल, तर तुमच्या शेजाऱ्यांना आणि हाउसिंग सोसायटीच्या सेक्रेटरींना तशी माहिती देऊन ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news