KALYAN DOMBIVALI
KALYAN DOMBIVALI

ठाणे : उल्हासनगरचा काही भाग कल्याण-डोंबिवली प्रभाग रचनेत : आमदार गायकवाड यांचा आरोप

Published on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्यांची नावे यादीतून उडवून टाकली आहेत. उल्हासनगर येथील काही भाग देखील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग रचनेत दाखवला आहे, असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. प्रभाग रचनांवर हरकती नोंदवण्यासाठी कल्याण महापालिकेच्या मुख्यालयात आले असता ते बोलत होते.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मागील आठवड्यात प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत. प्रभाग रचना कशा कराव्या? यासाठी काही नियमावली निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. मात्र या नियमांना डावलून सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी प्रभाग रचना केल्या असल्याचा आरोप भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

 भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत ते कधी पक्षाचे नव्हते. सध्या जे कार्यकर्ते आणि नगरसेवक पक्षात आहेत ते सक्षम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news