Thane Municipal Election: ठाणे महापालिका मतदानात गोंधळ; ईव्हीएम बिघाड, मतदार याद्यांवरून नाराजी

मशिन बंद पडणे, शॉक लागण्याच्या तक्रारी; काही ठिकाणी मतदान 25 मिनिटे ठप्प
Thane Municipal Election
Thane Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत सकाळपासूनच गोंधळ पाहायला मिळाला. मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीलाच काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले. तर काही ईव्हीएम मशीनला शॉक लागत असल्याच्या तक्रारी देखील मतदारांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया वेळेत सुरू होऊनही या सर्व कारणांमुळे काही ठिकाणी 20 ते 25 मिनिटे मतदान प्रक्रिया थांबवावी लागली.

Thane Municipal Election
KDMC Election Results 2026 Live Updates: कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप २०, शिंदे शिवसेना १०, तर मनसेची ४ जागांवर आघाडी

दुसरीकडे अनेक मतदार याद्यांमधील मतदारांची नावेच गायब असल्याचे प्रकार पुढे आले आहेत तर काही ठिकाणी मतदान केंद्र शोधताना नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावरच मतदारांनी या निवडणुकी दरम्यान संताप व्यक्त केला आहे.

Thane Municipal Election
Thane Municipal Election Result 2026 Live Updates: ठाण्यात शिंदेंची शिवसेना वाढून तर MIM ने देखील मारली मुसंडी

प्रभाग क्रमांक 14 मध्ये वेद हिंदी विद्यालयातील मतदान केंद्रावर 20 मिनिटे ईव्हीएम मशीन बंद होती. त्यानंतर तत्काळ दुसऱ्या मशीन या ठिकाणी बसवण्यात आल्या. ज्यांनी मतदान केले त्याचा सर्व्हर मात्र तोच असल्याने यासंदर्भात या ठिकाणी काही मतदारांनी आक्षेप देखील घेतला. या ठिकाणी केवळ मशीन दुसऱ्या बसवण्यात आल्या आहेत. कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मध्ये न्यू कळवा हायस्कूल येथील मतदान केंद्रात मशीनचे बटन दाबण्यात अडचण येत होती. जुन्या मशीन असल्याने या अडचणी मतदारांना येत होत्या.

Thane Municipal Election
Thane Ward Election: ठाण्यात मतदानानंतर तणाव; ईव्हीएम पळवण्यावरून राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

काही ठिकाणी मशीन देखील बदलाव्या लागल्याने झालेल्या विलंबामुळे मतदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी मतदानाला मतदारांचा मतदानाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला तर काही ठिकाणी मात्र मतदान केंद्रांवर कमी गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी मशीनमध्ये अ,ब,क,ड असा क्रम सुलट लावण्यात आल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

Thane Municipal Election
Ulhasnagar Muncipal Election | ऑनलाईन व प्रत्यक्ष मतदारयादीतील तफावतीमुळे प्रभाग 14 मध्ये अनेक मतदार मतदानापासून वंचित

मतदान केंद्रावर बॅनर झळकवल्याने राडा

वागळे इस्टेटमधील श्रीनगर परिसरातील मतदान केंद्रावर शिंदे गटाचे चिन्ह आणि उमेदवारांची नावे झळकवणारे पोस्टर लावण्यात आले होते. शिंदे गटाच्या या कारनाम्यामुळे परिसरात मोठा राडा झाला. दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांची निवडणूक अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news