

उल्हासनगर : पॅनल क्रमांक 14, बूथ क्रमांक 28 येथे उल्हासनगर महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ऑनलाईन मतदार यादी आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावर लावण्यात आलेली छापील यादी यामध्ये तफावत आढळून आल्याने मतसमोर आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सचिन कदम, जयश्री सुर्वे आणि मयुरेश कांबळी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नारखेडे हे मतदानासाठी गेले असता त्यांचे नाव ऑनलाईन यादीत असले तरी प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील यादीत नाव नसल्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदानास परवानगी नाकारली. या प्रकारामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. विशेष म्हणजे, पॅनल 14 मध्ये अशाच प्रकारे दहा ते पंधरा मतदारांना मतदान करता आले नसल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सचिन कदम, जयश्री सुर्वे आणि मयुरेश कांबळी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मतदारयादीतील तफावतीमुळे लोकशाहीच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असून, अशा चुका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे द्योतक असल्याचा आरोप मनसेच्या उमेदवारांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.