KDMC Election Results 2026 : कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा 'महाविजय'! भाजप-शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व, ठाकरेंच्या सेनेचा धुव्वा!

Kalyan Dombivli Election Results Live: कल्याण-डोंबिवलीचा गड कोण जिंकणार? प्रत्येक प्रभागाचा निकाल आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!
KDMC Election Results 2026
KDMC Election Results 2026file photo
Published on
Updated on

KDMC Election Results 2026

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदाना आधीच विरोधकांना हादरा देत आपले २१ उमेदवार बिनविरोध निवडून आणलेल्या महायुतीला विजयी बहुमत प्राप्त झाले आहे. १२२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजपला ४१ जागांवर तर शिवसेना शिंदे गटाला ५१ जागांवर विजय मिळाला आहे. गतनिवडणुकीत एकहाती सत्ता मिळवलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

विजयी उमेदवार आणि मिळालेली मते

प्रभाग क्रमांक- १

अ-वरुण पाटील (भाजप) मते-१५०८७

पराभूत -भरत वायले ( उद्धवसेना) मते- ८०८०

ब-सुप्रिया भोईर (शिंदेसेना) मते-१७२५१

पराभूत- मनिषा केदार (उद्धवसेना) मते-६१७८

क-शालीनी वायले (शिंदेसेना) मते-१९०२१

पराभूत-राजू तिकवडे ( उद्धवसेना) मते-८८५५

ड-जयवंत भोईर (शिंदेसेना) मते-१९२१५

पराभूत-निलेश भोईर (उद्धवसेना) मते-५१०८

प्रभाग क्रमांक -२

अ- दया गायकवाड(भाजप) मते-१२९०६

पराभूत- सुमित जाधव (मनसे) मते-४८२९

ब- अनघा देवळेकर (शिंदेसेना) मते-१२६२७

पराभूत- निता नाईक (उद्धवसेना) मते- ९५३९

क- वनिता पाटील (शिंदेसेना) मते-१२२३५

पराभूत- सरीता पाटील (उद्धवसेना) मते-८०८०

ड- गणेश कोट (शिंदेसेना) मते-११०९९

पराभूत- अर्जून म्हात्रे (अपक्ष) मते-९६४४

प्रभाग क्रमांक -३

अ- बंदेश जाधव (शिंदेसेना) मते-१३२४८

पराभूत- भूषण जाधव (मनसे) मते-११२५६

ब- हर्षाली थवील (शिंदेसेना) मते-१२६९४

पराभूत- ज्योती आभाळे (मनसे) मते -१०९५३

क- उपेक्षा भोईर (भाजप) मते-१४२८४

पराभूत- सुषमा पाटील (उद्धवसेना) मते १३९८३

ड- संतोष तरे (भाजप) मते-१२०७३

पराभूत- प्रदीप भोईर (उद्धवसेना)

प्रभाग क्रमांक-४

अ- तेजश्री गायकवाड (उद्धवसेना) मते-

ब- राहूल कोट (उद्धवसेना) मते-

क-रुपा शेट्टी (उद्धवसेना)

ड- रोहन कोट (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक-५

अ-रुपेश सपकाळ (शिंदेसेना) मते-७६६७

पराभूत-राजलक्ष्मी अंगारके (उद्धवसेना) मते-५७७६

ब-किरण भांगले (शिंदेसेना) मते-७८४५

पराभूत- धनराज कोहचाळे (उद्धवसेना) मते-६३०७

क-तनुजा वायले (शिंदेसेना) मते-७४५६

पराभूत-रेखा भोईर(मनसे) मते-६३५५

ड-प्रमिला पाटील (शिंदेसेना) मते-६८२०

पराभूत -कावेरी देसाई(मनसे) मते-५६८५

प्रभाग क्रमांक ७

अ-विजया पोटे ( शिंदे सेना) मते-१००८२

पराभूत-नयना भोईर(मनसे) मते-९११२

ब-श्यामल गायकर ( भाजप) मते-१२७५७

पराभूत-महेश वायले(उद्धवसेना) मते-७१०१

क-हेमलता पवार(भाजप) मते-१०५०४

पराभूत-सुजाता धारगळकर(उद्धवसेना) मते-५२९१

ड-गणेश लांडगे ( मनसे) मते-७६८५

पराभूत-संदीप गायकर (अपक्ष) मते-६८५८

प्रभाग क्रमांक ८

अ-रमीज मणियार (राष्ट्रवादी शदर पवार) मते-९७१६

पराभूत-पराग तेली(भाजप) ८५७८

ब-शमिना शेख(का’ग्रेस) मते-४६६५

पराभूत-अलिजा खोत(अपक्ष) मते-४६२७

क-कांचन कुलकर्णी (का’ग्रेस) मते-११२२७

पराभूत-वंदना गीध(शिंदेसेना) मते-८१४८

ड-अमित धाक्रस(भाजप) मते-६५३२

पराभूत-इफ्तेखार खान(का’ग्रेस) मते-५०८६

प्रभाग क्रमांक ११

अ-रेश्मा निचळ (शिंदेसेना) बिनविरोध

ब- मनिषा गायकवाड ( भाजप) मते-१३७८२

पराभूत-निलम व्यवहारे(आप) मते-३८७१

क-हरमेश शेट्टी (शिंदेसेना) मते-१०१७९

पराभूत-शांताराम गुळवे(उद्धवसेना) मते-९२१९

ड-निलेश शिंदे( (शिंदेसेना) मते-१०१६५

पराभूत-अनिकेत गायकवाड(मनसे) मते-८२५१

प्रभाग क्रमांक १२

अ-सविता निकम(शिंदेसेना) मते-१००६१

पराभूत -आरती पवार( उद्धवसेना) मते-५७५१

ब-ऐश्वर्या तांबोळी(शिंदेसेना) मते-८८९३

पराभूत-गायत्री चौधरी(उद्धवसेना) मते-६८१२

क-प्रमोद पिंगळे(शिंदेसेना) मते-८२२६

पराभूत-विक्रांत शिंदे(राष्ट्रवादी अजित पवार) मते-६४०६

ड-सचि पोटे(शिंदेसेना) मते- १०१५९

पराभूत-उदय रसाळ (उद्धवसेना) मते- ५९६३

प्रभाग क्रमांक १३

अ-किर्ती ढोणे ( उद्धवसेना) मते-८८४१

पराभूत-महादेव रायबाेळे( शिंदेसेना) मते-८११७

ब- पूजा गायकवाड( भाजप) मते-१०२३२

पराभूत-संध्या तरे(उद्दवसेना) मते-९४६५

क-सरोज राय(भाजप) मते-९९६२

पराभूत-श्वेता पांडे(उद्धवसेना) मते-८५९४

ड-मधुर म्हात्रे (उद्धवसेना) मते-१०७४३

पराभूत-विक्रम तरे(भाजप) मते-९०३२

प्रभाग क्रमांक १४

अ-सारीका जाधव(शिंदेसेना) मते-६५७३

पराभूत सारीका जाधव( उद्धवसेना) मते-३५१०

ब-हेमलता पावशे(भाजप) मते- ८१५८

पराभूत-यामिनी पावशे(उद्धवसेना) मते-५०६७

क-रमेश जाधव(शिंदेसेना) मते-५१३१

पराभूत-अनंता पावशे(अपक्ष) मते-४३८२

ड-राजाराम पावशे(शिंदेसेना) मते-६१९८

पराभूत-नितेश सावंत( उद्धवसेना) मते-३१९६

प्रभाग क्रमांक १७

अ-सविता भोईर (शिंदेसेना) मते-१७३२२

पराभूत-मोनिका गायकर(उद्धवसेना) १३२१५

ब-स्नेहल भाने(भाजप) मते-१५८८१

पराभूत-आराध्या दुबे(उद्धवसेना) मते-१११०१

क-मोरेश्वर भोईर(भाजप) मते-१८८५१

पराभूत-धनंजय गायकर (उद्धवसेना) मते-११०५८

ड-कुणाल पाटील(शिंदेसेना) मते-१७२८०

पराभूत-प्रजेश पाटील(उद्धवसेना ) मते-९७७४

प्रभाग क्रमांक १८

अ-रेखा चौधरी ( भाजप) बिनविरोध

ब-स्नेहल मोरे(भाजप) मते-१२१६५

पराभूत-प्रिती चौधरी(अपक्ष) मते-३७६३

क-नवीन गवळी(शिंदेसेना) मते-१५७३७

पराभूत-महेंद्र कुंदे(मनसे) मते-३६८२

ड-मल्लेश शेट्टी(शिंदेसेना) मते-१४३५७

पराभूत मोहंमद शेख(उद्धवसेना) मते-४१९४

प्रभाग क्रमांक २०

अ-शशिकांत कांबळे( भाजप) मते-१३५३२

पराभूत-प्रमोद कांबळे( उद्धवसेना) मते-४३१४

ब-शारदा चौधरी(भाजप) मते-१४२५२

पराभूत - विमल बुरसे(उद्धवसेना) मते-४१४७

क-खुशबु चौधरी (भाजप) मते-१५४६०

पराभूत -कांचन लोके(का’ग्रेस) मते-२१५७

ड-राहूल दामले(भाजप) मते- १३७७९

पराभूत-शंकर बुरसे( उद्धवसेना) मते-३४११

प्रभाग क्रमांक २१

अ- प्रल्हाद म्हात्रे ( मनसे) मते-९९०९

पराभूत-प्रदीप जोशी(भाजप) मते- ७५३६

ब- रविना म्हात्रे ( भाजप) मते-८५८५

पराभूत-वेदांगी म्हात्रे(मनसे) मते-८२६१

क- रेखा म्हात्रे (शिंदेसेना) मते-१०८६१

पराभूत-अर्चना पाटील(उद्धवसेना ) मते-५५९३

प्रभाग क्रमांक २२

अ-संदेस पाटील(मनसे) मते-१८५४६

पराभूत-प्रकाश भोईर(भाजप) मते-९६००

ब-रसिका पाटील ( मनसे) मते-१५१६९

पराभूत-अश्वीनी म्हात्रे( भाजप) मते-९७०२

क-कविता म्हात्रे (शिंदेसेना) मते-१५८०४

पराभूत-ट्विंकल भोईर(उद्धवसेना) मते-११७७०

ड-विकास म्हात्रे- (शिंदेसेना) मते-१५८९१

पराभूत-योगेंद्र भोईर (उद्धवसेना) मते-१०७३२

प्रभाग क्रमांक २३

अ-दीपेश म्हात्रे(भाजप ) बिनविरोध

ब-रसिका पाटील (भाजप) मते-१११९२

पराभूत-संगिता पाटील (अपक्ष) मते-२२७४

क-हर्षदा भोईर(भाजप) बिनविरोध

ड-जयेश म्हात्रे( भाजप) बिनविरोध

प्रभाग क्रमांक २४

अ-रमेश म्हात्रे(शिंदेसेना) बिनविरोध

ब-ज्योती पाटील(भाजप) बिनविरोध

क-वृषाली जोशी(शिंदेसेना) बिनविरोध

ड-विश्वनाथ राणे (शिंदेसेना) बिनविरोध

प्रभाग क्रमांक २५

अ-नंदू म्हात्रे(भाजप) मते-९११२

पराभूत-मनिषा धात्रक(मनसे) मते-५४२४

ब-मृदुला नाख्ये(भाजप) मते- ९००२

पराभूत-पूजा धात्रक (मनसे) मते-५३३०

क-समिर चिटणीस( भाजप) मते-९४२०

पराभूत-शैलेश धात्रक( मनसे) मते-६१७४

प्रभाग क्रमांक २६

अ-मकुंद पेडणेकर(भाजप) बिनविरोध

ब-रंजना पेणकर(भाजप) बिनविरोध

क-आसावरी नवरे(भाजप) बिनविरोध

ड-मंदार हळबे( भाजप) मते-१५३६३

पराभूत-पोपटलाल मारु (मनसे) मते-३४१५

प्रभाग क्रमांक २९

अ- कविता म्हात्रे ( भाजप) मते-१३०९२

पराभूत-रुपाली म्हात्रे(शिंदेसेना) मते-१०८६३

ब-आर्या नाटेकर (भाजप) मते-१३१००

पराभूत-रंजना पाटील(शिंदेसेना) मते-८९८३

क-मंदार टावरे (भाजप) मते-१२५५४

पराभूत-नितीन पाटील(शिंदेसेना) मते-९११३

ड-अलका म्हात्रे (भाजप) मते-१३३९२

पराभूत-रवी पाटील (शिंदेसेना) मते- ११२७१

प्रभाग क्रमांक ३०

अ-रविना माळी(भाजप) बिनविरोध

ब-विजय॰ी म्हात्रे(शिंदेसेना) मते-१३६७२

पराभूत-निकिता पाटील(उद्धवसेना) मते-१०८०१

क-संगीता म्हात्रे(शिंदेसेना) मते-११५४८

पराभूत-योगेश पाटील(मनसे) मते-९१८७

ड-अर्जून पाटील ( शिंदेसेना) मते-१५६८४

पराभूत-रामचंद्र माने(उद्धवसेना ) मते-७९८६

कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप ४१, शिंदे शिवसेना ५१, तर ठाकरे सेनेचा ७ जागांवर विजय

कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप २०, शिंदे शिवसेना १०, ठाकरे शिवसेना २, तर मनसेची ४ जागांवर आघाडी

पॅनल क्रमांक २१ मध्ये म्हात्रे घराणे शाहीच वर्चस्व

डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २१ मध्ये म्हात्रे घराणे शाहीच वर्चस्व ....

एकाच कुटुंबातील

दीर ,भावजय, सुनबाई तीन वेगवेगळ्या पक्षातून विजयी....

डोंबिवली पश्चिमे कडील

पॅनल क्रमांक २१

अ - प्रल्हाद म्हात्रे - मनसे- ९९०८ ( vijayi )

ब - रविना म्हात्रे - भाजप ८५८५( विजयी )

क- रेखा म्हात्रे - शिंदेसेना १०,८६१( विजयी)

पॅनल ७ ड मधून माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांना पराभवाचा धक्का, मनसेचे गणेश लांडगे विजयी

राज ठाकरेंचे शिलेदार प्रल्हाद म्हात्रे आणि गणेश लांडगे विजयी झाले आहेत.

पॅनल १२ ड मध्ये भाजपला धक्का

पॅनल १२ ड मधून भाजपचे माजी उपमहापौर विकी तरे पराभूत झाले आहेत. उबाठाचे

मधुर म्हात्रे विजयी झाले आहेत.

केडीएमसीत मनसेने खात उघडले

पॅनल क्र. २१ अ मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे विजयी झाले आहेत. तर कल्याण पश्चिम पॅनल ७ ड मधून गणेश लांडगे विजयी.

आतापर्यंतची आकडेवारी

भाजप - १९

शिवसेना शिंदे गट - १०

शिवसेना ठाकरे गट - ००

मनसे - ४

टपाली मतमोजणीला सुरुवात

कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

KDMC Election Results 2026 Live Updates

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरूवारी चुरशीने मतदान पार पडले. आज (दि. १६) मतमोजणी होत असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४८८ उमेदवारांचे भवितव्य आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. संपूर्ण शहरातील ३१ प्रभागांमधील १,५४८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया काल पार पडली. दरम्यान, मतदाना आधीच सत्ताधारी महायुतीने विरोधकांना हादरा देत एकूण १२२ सदस्यांपैकी आपले २१ उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.

या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे इथले खासदार असल्याने शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली हा विधानसभा मतदारसंघ असल्याने भाजपनेही येथे मोठी ताकद लावली आहे. महायुती विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात यंदा थेट आणि अटीतटीचा मुकाबला पाहायला मिळत आहे.

२१ जागांवर महायुतीचे नगरसेवक बिनविरोध

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपाचे १५ आणि शिवसेना ६ मिळून २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी १९ बिनविरोध उमेदवार डोंबिवलीकर आहेत. डोंबिवली हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. चव्हाण यांनी तब्बल १५ उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची किमया साधली. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही आपले कौशल्य दाखवत तेथे शिवसेनेचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले.

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या रंजना पेणकर, आसावरी नवरे, मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, मुकंद तथा विशू पेडणेकर, महेश पाटील, साई शेलार, दिपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉ. सुनिता पाटील, पूजा म्हात्रे, रविना माळी, मंदार हळबे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या ५४ पैकी ३७ जागांवर डोंबिवली परिसरात उमेदवारी दिली होती. कल्याण पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीणमध्ये भागात १७ जणांना उमेदवारी दिली होती. डोंबिवलीमध्ये भाजपचे २३ उमेदवार रिंगणात होते त्याचा फैसला आज आहे.

'या' लढती ठरणार लक्षवेधी

प्रमुख प्रभागांतील काही पॅनेलमधील लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांच्याविरोधात भाजपचे समीर चिटणीस आणि नंदू म्हात्रे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे प्रकाश भोईर आणि मनसेचे संदेश पाटील यांच्यातही चुरस होईल. प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवींद्र पाटील यांची भाजपच्या मंदार टावरे आणि अलका म्हात्रे यांच्यात चुरस होईल. प्रभाग क्रमांक ६ (कल्याण) येथे शिंदे गटाचे संजय पाटील तर ठाकरे गटाचे उमेश बोरगावकर आमने-सामने आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक २०, १२ (क), ७ (क) आणि ८ (क) येथील लढती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.

सर्वांचे लक्ष 'पॅनल २९' कडे!

डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये महायुती असूनही भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांविरुद्ध थेट लढत झाली. भाजपच्या उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. पॅनल क्रमांक २९ हे डोंबिवली पूर्वेत आहे. या पॅनलमध्ये शिवेसना आणि भाजपमध्ये थेट लढत झाली. या पॅनलमध्ये आधी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाली होती. परंतू शिवसेनेने दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने ही निवडणूक थेट भाजप विरुद्ध शिवसेना झाली आहे, या लढतींकडेही डोंबिवलीकरांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news