ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील किरवली येथे मुख्य जलवाहिनीमधून पाणी गळती होत आहे. ही पाणी गळती बंद करण्याचे तसेच इंदिरानगर पंपची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे घोडबंदरपासून ते किसनगरपर्यंत उद्या शुक्रवारी ठणठणाट असणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असा 6 तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे.
घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, रुपादेवी पाडा, किसननगर आदी भागात
6 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. तसेच या दिवशी स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा झोनिंग पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.