

ठाणे : उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले ब्रोम्बाडिअर कंपनीचे लिअर जेट 45 जातीच्या या विमानाचे उड्डाण 2003 पासून सततच्या बिघाडामुळे बंद केले होते. या जातीच्या विमानाचे जगभरात 6 अपघात झाले होते. त्यातील चार अपघात जीवघेणे होते. तर दोन अपघातात विमान अनियंत्रीत झाले होते. अजितदादा पवारांचा अपघात देखील विमान अनियंत्रीत झाल्याने झाला. कमाल ताशी 828 किमी वेगाने उडू शकणारे हे विमान 51 हजार फूट उंचीवरून उडू शकत होते. मात्र, उड्डाण बंद असलेले हे विमान अजित पवार यांनी वापरले खरे पण हा प्रवास त्यांचा अखेरचा ठरला.
अपघात झाला तेव्हा विमानाच्या इंजिनाचा वेगळा आवाज येत होता. जमिनीवर कोसळल्यावरस्फोट झाले आणि विमानाचे तुकडे जवळपास 300 ते 400 मीटरपर्यंत उडाले. निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत तातडीची गरज म्हणून हे विमान अजित पवार यांनी वापरले. दीड वर्षात पुणे परिसरात विमान अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या 9झाली आहे. खराब हवामान आणि विमानातील बिघाड यामुळेच हा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी विमान अपघातामध्ये अनेक उच्चपदस्थांचे अकाली मृत्यू ओढवले आहेत. भारताचे पहिले संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा तामीळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले यात 13 जणांचा मृत्यू झाला होता. 2011 मध्ये डोरजी खांडू या अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे उड्डाणाच्या वेळीच विमान जमिनीवर कोसळल्याने अपघातात मृत्यू झाला होता. पाच दिवसांनी मृतांचा शोध लागला होता. 2009 मध्ये आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले होते. ते बेल 430 हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. उद्योगपती ओ. पी. जिंदाल हे हरियाणाचे ऊ र्जा मंत्री असताना 2002 मध्ये दिल्लीहून चंदिगडला जाताना हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडले होते.
त्यांच्यासोबत कृषीमंत्री सुरेंद्र सिंग हेही होते. 2004 मध्ये अभिनेत्री के. एस. सौम्या एका विमान अपघातात मरण पावल्या होत्या. निवडणूक प्रचारासाठी त्या जात होत्या. बंगळूरुहून करिम नगरला जाताना हा अपघात घडला होता. 2002 मध्ये जी. एम. सी. बालयोगी हे लोकसभेचे 12 वे सभापती म्हणून काम पाहात होते. तेव्हा त्यांचे हेलिकॉप्टरमध्ये निधन झाले होते. बेल 206 हेलिकॉप्टरने ते जाताना अपघात झाला होता. 2001 मध्ये माजी रेल्वेमंत्री माधवराव सिंधीया यांचा दिल्लीहून कानपूरला जाताना विमान अपघात होउन मृत्यू झाला होता. खराब हवामान व ढगफुटीमुळे एका जाहीर सभेला पोहोचत असताना हा अपघात झाला.
1980 मध्ये दिल्लीतील सफदरजंग विमानतळावरून जाताना संजय गांधी यांचे फ्लाईंग क्लब विमान कोसळल्याने मृत्यूझाला होता. तर 1973 मध्ये माजी लोकसभा खा. सुरेंद्र मोहन कुमार मंगलम यांचा दिल्लीतील इंडियन एअर लाईन्सच्या अपघातात मृत्यू झाला होता. 1966 मध्ये होमी भाभा स्वीस आल्प्स्ा मधील माँट ब्लँक येथे 101 क्रॅश झाली तेव्हा अव्वल अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचा मृत्यू झाला होता. ते अणुशास्त्रज्ञ होते. 1963 रोजी एका हवाई अपघातात लेफ्टनंट जनरल बिक्रम सिंग, लेफ्टनंट जनरल दौलत सिंग व एअर व्हाइस मार्शल ईडब्ल्यू पिंटो यांच्यासह भारतीय सशस्त्र दलातील सहा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.