

कल्याण : कल्याण-मुरबाडकरांचे स्वप्न असलेल्या कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पास तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाठपुरावा करून मंजुरी मिळविली असली तरी प्रत्यक्षात 2024 सालचा राज्याचा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुल्या मनाने या रेल्वे प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे आश्वासित करून त्यांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली होती. त्यामुळे प्रकल्पाच्या निम्म्या खर्चाचा प्रश्न निकाली काढत कल्याण मुरबाड कराचे रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यास वाटा उचलला होता.2024 मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती.
7 जानेवारी 2024 रोजी वरप येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांचे पुन्हा कधी कल्याणला येणे झाले नाही. या मेळाव्यात कल्याणच्या विकासासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही, असे पवार यांनी आश्वासीत केले होते.
1. 2014 साली पुण्यातील माळीण गावात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले होते. त्यात अख्खे गाव गाडले गेले होते. अनेकांचा मृत्यू झाला होता. ही घटना पाहता त्यावेळी दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करत त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या रक्कमेतील
51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी डोंबिवलीतील राष्ट्रवादीचे तत्कालीन माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सूपूर्द करण्यासाठी जोशी यांनी भल्या पहाटे जाऊन पवार यांच्याकडे सोपवला होता. अजित पवार सकाळी सहापासून जनता दरबारातून जनतेची कामे करत असल्याने गावाकडील माणसे रात्र-रात्र जागून अजित पवार यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडायची दादा तिथेच त्यांच्या अडलेल्या कामांना न्याय मिळवून देत होते. प्रशासनावर चांगलीच पकड असल्याने सरकारी अधिकारी वर्गावर वाचक असल्याचे दादांच्या भेटीची आठवण देखील जोशी यांना आजही ताजी आहे.
2. वर्षभरापूर्वी 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी मिलापनगर वासियांचा एक अभ्यास दौरा बारामती येथे काढण्यात आला. मिलापनगरचे रहिवाशी व्यवसायाने उद्योजक शेतकरी असलेले बारामतीचे सुपुत्र भारत तावरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी बारामतीचा विकास कसा झाला आहे? हे प्रत्यक्ष पाहण्यास मिळाले होते. हा बारामतीचा विकास प्रामुख्याने पवार कुटुंबातील व्यक्तींमुळे झाल्याचे स्पष्ट दिसले होते. बारामतीमधील पवार कुटुंबाच्या प्रयत्नातून उभारलेले 120 एकरावरील कृषी विज्ञान केंद्र हे देशातील एकमेव शेती व शेतीपूरक व्यवसाय संदर्भात माहिती मिळण्याचे ठिकाण आहे. तेथील गेस्ट हाऊसमध्ये अभ्यास दौरा करणारे सर्व जण दोन दिवस मुक्कामी होते. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेचे शैक्ष. संकुल हे 400 एकर जमिनीवर वसले आहे. ते उभारण्यात पवार कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तेथील विकास पाहून डोळ्याचे पारणे फिटले. त्यांच्या आठवणी डोंबिवलीकरांना असल्याचे नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केले आहे.