ठाणे : दुचाकी चोरणारा अखेर जेरबंद; ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे : दुचाकी चोरणारा अखेर जेरबंद; ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Published on
Updated on

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शिंप्याचा बुरखा पांघरून दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या १० दुचाकी गाड्या आणि एक सायकल जप्त केली. मोहम्मद इसाक युनुस खान (वय ५४ रा. घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व) असे त्याचे नाव आहे.

डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून दुचाकी व सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे विष्णूनगर पोलिसांनी चोरांच्या शोधासाठी विशेष तपास पथक तयार केले होते. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना चोराला पकडण्यात य़श आले. मोहम्मद हा शिंपी व्यवसाय करतो. पोलिसांना 90 फुटी रोडला गस्त घालत असताना मोहम्मद हा सायकल हातात घेऊन रस्त्याच्या बाजुला उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता चोरीची प्रकार उघडकीस आला. डोंबिवली परिसरातून 9 दुचाकी, 2 सायकली चोरल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या सुमारे १० दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news