

कल्याण : साडे पाच कोटी रुपयांचे दागिने चोरी प्रकरणातील पोलिस तपासाला वेग आला असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
या चोरीच्या घटनेत सहा चोरटे असल्याची माहिती पाेलिस सूत्रांनी दिली आहे. चाेरट्यांच्या तोंडावर मास्क असल्याने त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले असून आरोपी हे सोलापूरचे असल्याचे माहिती आहे.
मुंबईत गोरेगाव येथे राहणारे अभयकुमार जैन त्यांची मुलगी तनिष्का हिच्यासोबत सोलापूरला गेले. त्यांच्याजवळ कोट्यावधी रुपयांचे दागिने होते. मुलीने सल्ला दिला होता की, बँगेत "जीओ टॅग गो" ट्रेकिंग डिव्हाईस लावले पाहिजे. जैन यांनी तिचा सल्ला ऐकला नाही. दागिने घेऊन सेालापूरला गेले.
काही दागिने विकले. उर्वरीत दागिने घेऊन ते सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईला परतत होते. सोलापूर ते कल्याण दरम्यान त्यांची साडे पाच कोटीचे दागिने भरलेले दोन ट्रॉली बँग चोरटे लंपास झाली होती. या प्रकरणी जैन यांनी कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कल्याण जीआरपी पोलिसांसह रेल्वे क्राईम ब्रांच ने या प्रकरणाचा तपास करीत आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा रेल्वे स्थानकात पाच ते सहा मास्क घातलेले लोक गाडीतून उतरताना दिसत आहे.
त्यांच्या हातात दोन ब’गा दिसून आल्या. या प्रकरणात एका व्यक्तीला रेल्वे क्राईम ब्रांचने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याची या चोरी प्रकरणात काय रोल आहे. त्याचा या गुन्हयात सहभाग आहे की नाही याचा तपास पोलिस करीत आहेत. चोरटे हे सोलापूर मांढा येथील राहणारे असल्याची माहिती सूत्रांनी दिली .
सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. प्रकरण ज्या प्रकारे घडले आहे. त्याचा अर्थ जैन यांच्याकडे दागिने आहे .ते कोणत्या गाडीने प्रवास करीत आहे. याची माहिती चोरट्यांना पूर्वीच होती असा संशय व्यक्त केला जात आहे .