

ठाणे: दिलीप शिंदे
गोरगरीब जनता, मध्यमवर्गीयांप्रमाणे डोंगर द-यातील आदिवासी वर्गापर्यंत बससेवा पोहोचविण्यासाठी एसटी महामंडव्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी पंचवार्षिक योजना हाती घेण्यात आली आहे. एअरपोर्टप्रमाणे बस पोर्टच्या निर्मितीसाठी खासगीकरणातून राज्यातील शहरी-ग्रामीण भागातील २१६ एसटी डेपोंचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाईल.
१ एप्रिलपासून स्वच्छतेसाठी ठेकेदार कंपनीची नियुक्ती, वर्षभरात ८ हजार नवीन स्मार्ट बसेसची खरेदी, सोलार विजेच्या निर्मितीतून एक हजार कोटींचे नवीन उत्पन्न अराणि छावा नावाचा खास अॅप विकसित करत एसटी महामंडळाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम हाती घेण्यात आले, अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दैनिक 'पुढारी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
एस.टी. हे फायद्याचे महामंडळ आहे असे नव्हे, तर राज्यातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला सेवा देण्याचे साधन म्हणून एसटीकडे बघितले पाहिजे, राज्याची आर्थिक स्थिती जरी योग्य नसली, तरी एसटीला आर्थिक पाठबळ देणे हे राज्याचे कर्तव्य आहे. शासनाने ती त्यांची भूमिका पार पाहायलाच हवी. त्या माध्यमातून एसटी महामंडळाचा अध्यक्ष तसेच परिवहन मंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी माझा योग्यप्रकारे संवाद आहे. अर्थमंत्री म्हणून अजित दादा हे काटकसर करतात असे जरी लोक बोलत असले, तरी एसटी महामंडळावाचत त्यांनी काटकसर कधीच केली नाही.
एसटीची आर्थिक स्थिती खराब असली, तरी दिवाळी बोनस कर्मचा यांना वेळेत देण्यात आले. कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत, हे मान्य आहे. त्यांची ५० टक्के देणी देण्यात आली असून महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारेल तशी थकीत देणी टप्प्याटप्प्याने दिली जातील, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस
दरवर्षी पाच यहामाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस खरेदी करीत आहोत. तथापि, जुन्या झालेल्या बसेस स्क्रॅपमध्ये टाकण्याचे काम सुरू होईल. एसटीकडे १८ हजार बसेस कार्यरत आहेत. त्यात दहा वर्षांवरील बसेसचा भरणा अधिक आहे. २०२५ २६ मा आर्थिक वर्षात ३ हजार नवीन बसेस आणि पट्टील आर्थिक वर्षात (२०२६-२०२७) पाच हजार अशा एकूण आठ हजार नवीन बसेस खरेदीसाठी निविदा प्रकिया झाल्या आहेत. या सर्व स्मार्ट बसेस असून त्यांच्यामध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा लावणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
नवीन बसेसमध्ये सर्वसामान्यांना सोयी-सुविधा
आगामी सहा महिन्यांत सेवेत दाखल होणाऱ्या ३ हजार बसेसचे कंत्रार टाटा व अशोक लेलोंड या दोन कंपऱ्यांना विभागून देण्यात आले बसेस पुढील सहा महिन्यांत रस्त्यावर धावतील आणि पुढील सहा महिन्यांत आणखी पाच हजार स्मार्ट बसेस एसटीमध्ये दाखल होतील. या सर्व बसेस लालपरी असून त्या सर्वसामान्यांचा विचार करून खरेदी केल्या जात आहेत. सर्वसामान्यांना चांगल्या सोयी डासच्या असतील, तर आरामदायी बसेसचे प्रमाण कमी करून नव्या लालपरीला प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर पुढील वार्षी २०० व्हॉल्व्ही बसेस घेण्याचा मानस असून, त्यात ६० स्लीपर कोच बसेलचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
एकूण बसेसपैकी ३० टक्के इलेक्ट्रिक
पर्यावरणपूरक बससेवा देण्यावर महामंडळाने भर दिला आहे. एसटीकडील एकूण बसेसपैकी ३० टक्के चसेस या विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सीएनजी, एलएमजीवर चालणाऱ्या गाड्या या बरोबर चालत नसून त्या गाळ्यांना महत्व नाही, असे निदर्शनात आले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत एसटीकडील सात ते आठ वर्षांच्या जुन्या बसेस गा इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरीत करणार असल्याचे सरनाईक म्हणाले.
आगार विकासासाठी खास ७२ पॅकेज
पहिल्या टप्प्यात २१६ बस आगार पी. पी. पी. च्या माध्यमातून विकसित होतील. शहरी भागातील आगार विकसित करताना ग्रामीण आगारांचा विकास करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी खास ७२ पॅकेज तयार करण्यात आले आहेत. एका पॅकेजमध्ये तीन आगारांचा समावेश असून, त्यामध्ये एक शहरी आणि दोन ग्रामीण आगार असतील, हा विकासाचा लीज करार ९८ वर्षाचा असेल. त्यामुळे ग्रामीण भागातील आगारांसाठी महामंडळाला स्वतःथा निधी खर्च करावा लागणार नाही.
आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी सौर ऊर्जानिर्मिती
महामंडळाला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी सौर ऊर्जा निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील एसटीच्या मोकळ्या जागेवर सोलर पॅनल उभारून वीज निर्मिती केली जाणार आहे. ही वीज महामंडळ खरेदी करेल, ती बीज इलेक्ट्रिक बसेस, आगार व अन्य कार्यालयांसाठी वापरली जाईल. त्यामुळे दरवर्षी महावितरण कंपनीला वीज खरेदीसाठी शेकडो कोटी मोजावे लागणार नाहीत. आगामी दहा वर्षांत एसटीला तब्बल एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे सरनाईक यांनी सांगितले.