Sehar Sheikh: 'मुंब्रा को पुरा हरा करना है', म्हणणाऱ्या AIMIMच्या नगरसेविका सहार शेख यांचा माफीनामा

Sehar Sheikh Apology: ठाणे महापालिका निवडणुकीनंतर AIMIM नगरसेविका सहार शेख यांच्या 'मुंब्रा को पुरा हरा करना है' या वक्तव्यावरून वाद झाला होता.
Sehar Sheikh Apology
Sehar Sheikh ApologyPudhari
Published on
Updated on

Mumbra AIMIM Sehar Sheikh Apology: ठाणे महापालिका निवडणुकीत AIMIMला मुंब्रा भागात मिळालेल्या यशानंतर नव्या नगरसेविका सहार शेख यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. “अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वक्तव्य त्यांनी विजयाच्या भाषणात केले होते. त्यानंतर या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं.

या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारींची दखल घेत मुंब्रा पोलिसांनी सहार शेख यांना नोटीस पाठवली.

पोलिस चौकशीनंतर सहार शेख यांनी लेखी माफीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या माफीनाम्यात सांगितले की, भाषणातील 'हरा' हा शब्द पक्षाचा झेंडा आणि निशाणीच्या संदर्भात वापरण्यात आला होता. “माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर आणि लेखी माफी मागते,” असेही त्यांनी माफीनाम्यात म्हटले आहे.

Sehar Sheikh Apology
ChatGPT Hacks: ChatGPT कडून शिका या 10 ट्रिक्स; तासांचं काम एका मिनिटात होईल, वेळेची होईल जबरदस्त बचत

किरीट सोमय्यांनी घेतली पोलिसांची भेट

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेतली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून तक्रारदारांना कळवण्यात आलं की, नगरसेविकेने माफीनामा दिला आहे.

Sehar Sheikh Apology
New Bill Minister Removal: पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना हटवण्याचं बिल धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा, काय आहेत आक्षेप?

माफीनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण मिटले आहे. मात्र भविष्यात अशाच प्रकारची विधानं किंवा सामाजिक वातावरण बिघडवणारी कृती झाली, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

मुंब्रा परिसरातून AIMIMचे पाच नगरसेवक निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली होती. निवडणूक निकालानंतरच्या भाषणात सहार शेख यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर सोशल मिडियावर अनेकांनी सहार शेख यांच्या भाषणाचा निषेध केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news